तू तिथे मी! निकसोबत ब्राझीलमध्ये पोहोचली प्रियांका

स्टेजवर लाखो प्रेक्षकांसमोर गात असलेल्या निकची एक झलक कॅमेरात टिपण्यासाठी प्रियांकाचा खटाटोप सुरू होता.

प्रियांकाची धडपड कॅमेरात कैद झाली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निक आणि प्रियांका चोप्रा यांच्यातील कथित प्रेमप्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. आठवड्याभरापूर्वी भारतात आलेलं हे जोडपं आता थेट ब्राझीलमध्ये पोहोचलं आहे. खरं तर निकसोबत प्रियांका अमेरिकेत जाणार असं म्हटलं जात होतं मात्र आता ब्राझीलमध्ये पार पडलेल्या निकच्या लाईव्ह म्युझिक शोसाठी प्रियांकानंदेखील उपस्थिती लावली होती.

प्रियांका प्रेक्षकांत बसून निकला प्रोत्साहन देत होती. तिनं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर निकचा व्हिडिओही शेअर केला आहे. स्टेजवर लाखो प्रेक्षकांसमोर गात असलेल्या निकची एक झलक कॅमेरात टिपण्यासाठी प्रियांकाचा खटाटोप सुरू होता, यावेळी प्रियांकाची ती धडपड कॅमेरात कैद झाली. निकच्या यापुढील म्युझिक शोसाठीदेखील प्रियांका त्याच्यासोबतच असणार आहे.

गेल्याआठवड्यात प्रियांका आणि निक भारतात आले होते. यावेळी आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या मेहंदी कार्यक्रमालाही या दोघांनी उपस्थिती लावली होती. महिनाभरात प्रियांका आणि निक हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka chopra attends nick jonas music concert in brazil