Priyanka Chopra Cannes Lions Looks : बॉलीवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हॉलीवूडमध्ये तिचे करिअर घडवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत ती अनेकदा सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर ती तिची स्पष्ट भूमिका मांडत असते. स्पष्टवक्तेपणासह प्रियांका तिच्या ग्लॅमरस आणि हटके फॅशनमुळेही नेहमी चर्चेत असते. नुकतीच ती प्रतिष्ठित ‘कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिवल’मध्ये सहभागी झाली होती. तिने कला आणि सिनेमाबद्दल मत मांडताना तिचे अनुभव मांडले. प्रियांकाच्या भाषणासह तिच्या खास स्टायलिश लूकची सर्वत्र चर्चा रंगली. विविध रंगांच्या ब्लॉक पॅटर्न असलेल्या तिच्या आकर्षक ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, त्याची किंमत ऐकून चाहते थक्क झाले आहेत.

‘कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ क्रिएटिव्हिटी’ हा एक प्रतिष्ठित सोहळा असून, या पाच दिवसीय महोत्सवामध्ये सिनेमा, फॅशन आणि मनोरंजन विश्वातील विविध विषयांवर चर्चा केली जाते. त्यामध्ये अनेक दशके मनोरंजन विश्वामध्ये काम करणाऱ्या प्रियांका चोप्राने सहभागी होत तिची वेगळी छाप उमटवली. सध्याच्या काळातील बदलणारे मनोरंजन विश्व, तरुण पिढीचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन, नवनवीन कल्पना आणि घरकाम ही महिलांची जबाबदारी नाही, अशा अनेक विषयांवर प्रियांकाने तिची स्पष्ट मते मांडली. यावेळी आंतरराष्ट्रीय मंचावर तिने आपल्या फॅशन स्टेटमेंटने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाने डिझायनर सिल्व्हिया चेरासी यांचा ‘कलर-ब्लॉक्ड’ हॉल्टर ड्रेस स्टाईल केला आहे. तिच्या या लूकची आणि ड्रेसची जोरदार चर्चा सुरू आहे.

लक्झरी रोलेक्स घड्याळ अन् लेदर थॉन्ग सँडल्स केले स्टाईल

प्रियांका चोप्राने ‘कान्स लायन्स फेस्टिवल’मध्ये तिचा साधा, पण अत्यंत आकर्षक असा लूक केला होता. यावेळी तिने वेगवेगळ्या रंगांची रंगसंगती असलेला फॉईंग स्टाईल ड्रेस परिधान होता. या ड्रेससह तिने फ्रेडा साल्वाडोर ब्रँडच्या लेदर थॉन्ग सँडल्स स्टाईल केल्या होत्या. या सँडल्सची किंमत सुमारे ३५ हजार ५७४ रुपये आहे. त्यासह तिने गुलाबी रंगाचा नेकलेस आणि लक्झरी रोलेक्स डे-डेट ४० चॉकलेट डायल घड्याळ वापरीत आपला लूक पूर्ण केला. तसेच दुसऱ्या हातामध्ये ब्रेसलेट आणि विविध प्रकारांच्या अंगठ्या तिने स्टाईल केल्या होत्या. प्रियांकाच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिच्या ड्रेसची चर्चा होत आहे. तरुणींना आकर्षित करणाऱ्या या ड्रेसची किंमत लाखोंमध्ये आहे.

प्रियांका चोप्राच्या ड्रेसची किंमत किती

हाय-शाईन सॅटिन इटालियन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या या मॅक्सी स्टाईल ड्रेसमध्ये प्रियांका चोप्रा अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसत होती. त्याला हॉल्टर नेकलाइन असून, कॉलम सिल्हूट डिझाईन देण्यात आले होते. आकर्षक नेकलाईनसह ड्रेसला मागील बाजूस टाय डिटेलिंग करण्यात आले होते. या एलिगंट ड्रेसची किंमत लाखोंमध्ये आहे. डिझायनर सिल्व्हिया चेरासी यांच्या या ड्रेसची किंमत सुमारे १.८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

सिल्व्हिया टेचेरासीच्या अधिकृत वेबसाइटवर ड्रेसची किंमत

ब्राऊन टोनवर ग्लॅमरस मेकअप अन् हेअरस्टाईल

या खास लूकसाठी प्रियांका चोप्राने केस मोकळे सोडून वेव्ही हेअरस्टाईल केली होती. मध्यभागी पार्टिशन केलेल्या या हेअरस्टाईलमुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता. तिच्या ब्राऊन टोनवर ग्लॅमरस मेकअप आणखी खुलून दिसत होता. हलकी ब्लाऊन लिपस्टिक, हायलायटर आणि एलिगंट मेकअपने तिच्या लूकला स्टायलिश टच दिला. प्रियांका चोप्राचे या ‘कान्स लायन्स’ लूकमधील फोटो व्हायरल झाले असून, तिची दिलखेचक अदा आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.