scorecardresearch

Premium

स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसली प्रियांका, पाहा हा VIRAL व्हिडीओ

प्रियांका चोप्राचा स्विमिंग पूलमधील डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.

priyanka chopra bikni look, priyanka chopra pool dance,
प्रियांका चोप्राचा स्विमिंग पूलमधील डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.

अभिनय, फॅशन, हटके लूकमुळे प्रियांका चोप्राचा चाहतावर्ग सातासमुद्रापलिकडे पोहोचला. सोशल मीडियावर तर तिचे लाखो चाहते आहेत. एखादा फोटो, व्हिडीओ तिने पोस्ट केला की काही मिनिटांमध्येच तिच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

प्रियांकाचा असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसतेय. काळ्या रंगाच्या बिकनी लूकमुळे प्रियांका या व्हिडीओमध्ये अधिक उठून दिसत आहे. प्रियांकाने हा व्हिडीओ पोस्ट करताच काही मिनिटांमध्येच नेटकऱ्यांनी याला पसंती दिली आहे.

do you ever eat Manchurian Samosa
मंच्युरियन समोसा कधी खाल्ला का? एकदा व्हिडीओ पाहाच; नेटकरी म्हणाले, “त्यात गुलाबजामून पण टाका…”
kiara-advani-don3
डॉन युनिव्हर्समध्ये झाली ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; ‘डॉन ३’मध्ये प्रथमच रणवीर सिंगसह करणार स्क्रीन शेअर
russia ukraine war
युक्रेन युद्ध अन् पाश्चिमात्य निर्बंध असूनही रशियाची अर्थव्यवस्था सुस्थितीत कशी?
Loksatta lokrang Documentary The art of presenting reality video medium Work Studies in Folklore and Culture
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: वास्तव मांडण्याची कला..

प्रियांका नव्वदच्या दशकातील हिंदी गाणी ऐकत त्यावर थिरकताना दिसत आहे. आमिर खानच्या ‘दिल है की मानता नहीं’, ‘नीले नीले अंबर’ यांसारख्या रिमिक्स गाण्यांचा आनंद ती घेत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं आहे की, “अचानक जेव्हा काही तास तुम्हाला स्वतःसाठी मिळतात तेव्हा साऊंड ऑन होतो. आवाज ऐकून ही कोणती गाणी आहेत हे तुम्ही ओळखू शकता का?” प्रियांकाचा या व्हिडीओमधील स्टायलिस्ट लूक लक्ष वेधून घेणारा आहे.

आणखी वाचा – अपघाताच्या २६ दिवसांनंतर मलायकाचा ‘तो’ फोटो आला समोर, कपाळावर दिसली खूण

प्रियांका सध्या तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. कुटुंबासोबत अधिकाधिक एकत्रित वेळ घालवणं तिने पसंत केलं आहे. ती परदेशात राहत असली तरी तिथे भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सण प्रियांका साजरा करते. यामध्ये तिच्या सासरच्या मंडळींचा देखील समावेश असतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra dances to aamir khans song in the pool her video viral on social media kmd

First published on: 29-04-2022 at 14:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×