‘याला म्हणतात अश्लीलता…’, निकसोबतच्या त्या फोटोमुळे प्रियांका झाली ट्रोल

प्रियांकाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

priyanka chopra, priyanka chopra instagram, nick jonas,
प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या पती निक जोनससोबत असल्याचे दिसत आहे. त्याचे काही फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

प्रियांकाने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका निकसोबत दिसत आहे. प्रियांकाने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर निक तिच्या पाठी चाकू आणि काटा घेऊन असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘स्नॅक’ असे कॅप्शन प्रियांकाने दिले आहे.

आणखी वाचा : ‘प्रियांका ताई, तुमचं हे काय चाललं आहे?…’, प्रियांकाच्या पोस्टवर कमेंट करत परिणीतीनेच केलं ट्रोल

प्रियांकाचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘शी यार हे काय झालं आहे तुम्हाला.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे सगळं करण्यासाठी तुला अमेरिकेला पाठवलं आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘याला म्हणतात अश्लीलता, आम्ही तुझ्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासारखा असल्याचं तुला वाटतं?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही काय भारताची संस्कृती आहे.’

priyanka chopra, priyanka chopra instagram,
प्रियांकाच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

 

आणखी वाचा : ‘कोरिओग्राफरने २० मॉडेल समोर मला…’, मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी क्रितीने केला खुलासा

दरम्यान, प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात सेलिन डायोन आणि सॅम ह्यूघन मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय ती ‘मॅट्रिक्स ४’ आणि अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priyanka chopra got trolled on social media netizen says this is called vulgarism dcp

ताज्या बातम्या