scorecardresearch

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपटावर प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया, म्हणाली…

प्रियांकाने अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आगामी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असून ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका ही सध्या पती निक जोनससोबत अमेरिकेत स्थायिक झाली आहे. प्रियांका ही अनेकदा विविध बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य करत असते. नुकतंच प्रियांकाने अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आगामी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Video : “खूप झालं, मला तुला डान्स शिकवायचा नाही…”; आगरी-कोळी कॉमेडी किंग विनायक माळीवर अमृता खानविलकर संतापली

नुकतंच प्रियांका चोप्राने तिच्या इन्सटाग्रामवर चंद्रमुखी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. यासोबत तिने चंद्रमुखी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. प्रियांकाने हे पोस्टर शेअर करत ‘अभिनंदन आदिनाथ कोठारे. येत्या २९ एप्रिलला चंद्रमुखी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात’, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra jonas comment amruta khanvilkar and addinath kothare on chandramukhi trailer nrp

ताज्या बातम्या