प्रियांका चोप्रा लाँच करणार कबीर बेदींचे आत्मचरित्र

जाणून घ्या सविस्तर..

दिग्गज अभिनेते कबीर बेदी हे गेल्या काही दिवसांपासून ‘स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द अॅक्टर’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. आता बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा कबीर बेदींचे आत्मचरित्र लाँच करणार असल्याचे समोर आले आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित हिंदीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्व जे आपल्या जीवन कहाणीसोबत लेखक बनले आहेत, ते आता कबीर यांच्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचे अनावरण करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांना एकाच मंचावर अनुभवणे ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. कबीर यांच्या पुस्तकासाठी प्रियांका लंडनहून व्हर्चुअल पद्धतीने जोडली जाणार असून त्याचा प्रीमियर एका मनोरंजन पोर्टल आणि कबीर यांच्या सोशल मीडियावर १९ एप्रिलला संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.

कबीर जे आपल्या आत्मचारित्रातून पहिल्यांदाच लेखक म्हणून समोर येत आहेत, ते एक आंतरराष्ट्रीय स्टार आणि मैत्रीण प्रियांकासोबत पुस्तक लाँच करण्याची उत्सुक आहेत. नुकतेच प्रियांकाने देखील तिचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’ प्रकाशित केले. या पुस्तकाच्या रूपाने लेखक म्हणून तिने पदार्पण केले आहे.

कबीर बेदी यांच्या “स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द अॅक्टर” या आत्मचरित्रात त्यांच्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत जीवनातील उतार चढाव, विवाह, घटस्फोट, तुटणाऱ्या नात्यांची, बदलत्या विश्वासाची, त्याचे भयावह झटके यांसोबतच भारत, यूरोप आणि हॉलिवूडमधील रोमांचक दिवस याबाबतची कहाणी आहे. ही एका माणसाच्या घडण्याची, तुटण्याची आणि पुन्हा जुळण्याची कहाणी आहे.

कबीर बेदी यांचे “स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द अॅक्टर” १९ एप्रिल २०२१ला भारतातील ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकस्टोर्समध्ये प्रकाशित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka chopra kabir bedi book story i must tell avb

ताज्या बातम्या