बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केले आहे. त्यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनसचे आडनाव लावले होते. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनस हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. दरम्यान, आता प्रियांकाने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

घटस्फोटांच्या चर्चेत प्रियांकाने ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शोमध्ये हजेरी लावली होती. हा शो काल नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या शोमध्ये प्रियांका पती निक आणि दिरांसोबत दिसत आहे. यावेळी प्रियांका म्हणाली, “जोनस कुटुंबात निक आणि माझी एकमेव जोडी आहे, ज्यांना बाळ नाही. म्हणूनच मी निक ही घोषणा करण्यास उत्सुक आहोत आणि आम्ही चांगली बातमी देणार आहोत…”

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चेत ‘या’ महिला क्रिकेटपटूला करायचं त्याच्याशी लग्न

प्रियांकाने सगळ्यांसमोर दिलेल्या या बातमीनंतर निकला धक्का बसला. त्यानंतर पटकन प्रियांका म्हणाली, “आज रात्री नशा करून उद्या पर्यंत झोपून जायचं” त्यानंतर निककडे पाहून प्रियांका म्हणाली, “मी जेव्हा ते बोलले तेव्हा तुझा चेहरा खरोखर बघण्यासारखा होता” ज्यावर निकने उत्तर दिले: “हो, मला थोडी काळजी वाटली.” तुम्हाला कळलं नसेल तर हे सगळं प्रियांका ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शोमध्ये निकला रोस्ट करण्यासाठी बोलत होती. यावेळी फक्त प्रियांका नाही तर अनेक सेलिब्रिटींनी जोनस ब्रदर्सला रोस्ट केले आहे.

Story img Loader