Tumbbad 2 Movie Update : असे अनेक चित्रपट असतात जे प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्य संख्येने पाहिले जात नाही किंवा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. मात्र त्याच्या कथानकामुळे हळूहळू लोक चित्रपटाला पसंती देतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘तुंबाड’  २०१८ मध्ये आलेल्या ‘तुंबाड’ या हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. या चित्रपटाच्या सीक्वलची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आता ‘तुंबाड २’ ची घोषणा झाल्याने प्रेक्षकांमध्ये याबद्दल उस्तकता वाढली आहे.

‘तुंबाड’ हा चित्रपट सात वर्षांपूर्वी रिलीज झाला होता, पण हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आणि अनेकांची पसंती मिळाली. २०२४ मध्ये जेव्हा ‘तुंबाड’ पुन्हा थिएटरमध्ये (री-रिलीज) झाला, तेव्हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. आता पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये याचा सिक्वेल येणार आहे, आणि त्यालाही तसाच मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ‘तुंबाड २’ या सीक्वलची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर यामध्ये कोण झळकणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

तुंबाड २मध्ये कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार?

‘जागरण’च्या वृत्तानुसार ‘तुंबाड २’ साठी कोणत्या अभिनेत्रीची निवड केली जाणार याबद्दल अजून काही निर्णय घेण्यात आलेला  नाही. चित्रपटाचे निर्माते ही कथा अजून मोठी आणि रंजक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि नयनतारा यांची नावं समोर आली आहेत. त्यामुळे आता या अभिनेत्रींपैकी या चित्रपट कोणाची वर्णी लागणार की याव्यतिरिक्त कुठल्या अभिनेत्रीची निवड होणार हे येत्या काळातच कळेल.

निर्मात्यांना कथेत एक महत्त्वपूर्ण महिला पात्र दाखवायचं आहे. सध्या चर्चा सुरू आहे, पण अजून कोणतीही अंतिम निवड झालेली नसल्याचं म्हटलं जातंय.  ‘तुंबाड २’ हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

बुधवारी (२९ एप्रिल) निर्मात्यांनी सोशल मीडियामार्फत ही तारीख जाहीर केली. त्या पोस्टरमध्ये तीन मूर्ती दिसतात, वर चित्रपटाचे नाव आणि खाली रिलीजची तारीख दिली आहे. पोस्टरवर ‘प्रलय येणार’ अशी टॅगलाइन आहे. म्हणजेच, काही महिन्यांनंतर मोठ्या पडद्यावर भयानक तांडव पाहायला मिळणार आहे.