scorecardresearch

वडिलांचा जुना फोटो शेअर करत प्रियांका चोप्राने साजरा केला कन्या दिवस; म्हणाली, “माझ्यासाठी प्रत्येक दिवस…”

२५ सप्टेंबर रोजी ‘कन्या दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रियांकाने सोमवारी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

वडिलांचा जुना फोटो शेअर करत प्रियांका चोप्राने साजरा केला कन्या दिवस; म्हणाली, “माझ्यासाठी प्रत्येक दिवस…”
या फोटोमध्ये चोप्रा कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसत आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनससह गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्क दौऱ्यावर आहे. संयुक्त राष्ट्र महासंघाच्या एका कार्यक्रमासाठी तिला आमंत्रित करण्यात आले होते. न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये तिने सूत्रसंचालन देखील केले. या फेस्टिव्हलमध्ये निक आणि त्याच्या भावांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामधले या जोडीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

प्रियांका चोप्रा ग्लोबल स्टार आहे. तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही नाव कमावले आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांना तिच्या आयुष्यातले अपडेट्स देत असते. २५ सप्टेंबर रोजी ‘कन्या दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने तिने सोमवारी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. प्रियांकाने तिच्या लेकीला जवळ घेत काढलेला फोटो आणि तिच्या वडिलांबरोबर नाचतानाचा एक जुना फोटो जोडून तयार केलेला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. या फोटोला तिने एक छान गाणं देखील जोडलं होतं.

आणखी वाचा – “….तेव्हा अमेरिकेचा शोधही लागला नव्हता,” आपल्या भाषणाने चियान विक्रमने वेधले लक्ष

या फोटोमध्ये चोप्रा कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसत आहेत. तिने या फोटोवर ‘एका दिवसाच्या अंतराने, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस कन्या दिवस आहे’, असे लिहिले आहे. तिचे वडील डॉ. अशोक चोप्रा भारतीय सैन्यामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांचे २०१३ मध्ये निधन झाले. प्रियांकाने शेअर केलेला फोटो त्यांच्या घरातल्या एका पार्टीमधला आहे. कामाच्या गडबडीत असल्याने तिने कन्या दिनाच्या दुसऱ्या दिवशी फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या बोलण्यामध्ये नकळत वडिलांचा उल्लेख होत असतो.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकर म्हणाले “गौरव मोरे, शिवाली…”

प्रियांका आणि निक हे हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. २०१८ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांच्या सरोगसीच्या मदतीने तिच्या मुलीला जन्म दिला आहे. ‘मालती मेरी’ असे त्यांच्या मुलीचे नाव आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या