‘जाऊ नको दूर बाबा…’ वडिलांच्या आठवणीत भावूक प्रियांका

या व्हिडिओमध्ये प्रियांकाने तिचे बाबा कसे होते याची छोटीशी झलक दाखवली आहे

Priyanka-Chopra
प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राच्या वडिलांची आज पाचवी पुण्यतिथी. वडिलांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त प्रियांकाने वडिलांसोबतचे लहानपणीपासूनचे फोटो व्हिडिओ स्वरुपात तिने शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांकाने तिचे बाबा कसे होते याची छोटीशी झलक दाखवली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये सिनेमातील तिने गायलेले ‘जाऊ नको दूर बाबा…’ हे गाणे तिच्या मनातील भावना व्यक्त करतात.

‘मी माझ्या बाबांच्या फार जवळ होती. ते माझे हिरो होते. ते फार टॅलेंटेड होते. ते खऱ्या अर्थाने आयुष्य मनमुराद जगायचे. माझ्या आयुष्यातील ते आदर्श व्यक्ती आहे. मला त्यांच्यासारखे व्हायचे आहे. त्यांच्यासारखा आत्मविश्वास माझ्यातही यावा.’ असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. १० जून २०१३ मध्ये प्रियांकाच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते. ते ६४ वर्षांचे होते. प्रियांकाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती ‘भारत’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून फार वर्षांनंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/Bj1nrDmAumH/

सिनेमांशिवाय सध्या ती ‘क्वांटिको’ मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये काम करत आहे. सध्या या सीरिजच्या एका एपिसोडवरुन फार वाद होत आहेत. ‘क्वांटिको ३’ मधील एका भागात आतंकवादी हल्ल्या मागे भारतीयांचा हात असल्याचे म्हटले गेले होते. याच कारणामुळे सध्या प्रियांकाच्या नावावरुन वाद सुरू आहे. प्रियांकाने यासाठी माफीही मागितली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka chopra remembers her dad on his death anniversary watch video