बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाते. पण यासोबतच ती बिझनेसच्या क्षेत्रातही चांगलीच सक्रिय आहे. परदेशात तिचं एक रेस्टॉरंट आहे. जिथे भारतीय पद्धतीचे पदार्थ मिळतात. प्रियांकानं जेव्हा हे रेस्टॉरंट सुरू केलं तेव्हा याची जोरदार चर्चा झाली होती. आता भारतीय दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी नुकतीच प्रियांकाच्या या रेस्टॉरंटला भेट दिली असून या रेस्टॉरंटमधील भारतीय जेवणाची चव कशी आहे यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि प्रियांका चोप्रा यांनी ‘कमीने’, ‘७ खून माफ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांनी अलिकडेच प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटला भेट देत. तिथे मिळणाऱ्या भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यानंतर विशाल भारद्वाज यांनी प्रियांका चोप्रासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या रेस्टॉरंटचं आणि तिथे मिळणाऱ्या भारतीय खाद्यपदर्थांचं कौतुक केलं. मागच्याच वर्षी प्रियांकानं न्यूयॉर्कमध्ये हे रेस्टॉरंट सुरू केलं असून ती स्वतः देखील तिथे तिच्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेताना दिसते.

आणखी वाचा- कार्तिक- क्रिती करतायत एकमेकांना डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

विशाल भारद्वाज यांनी आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मित्रांसोबत एक सुंदर रात्र आणि न्यूयॉर्कमध्ये एका ट्वीस्टसोबत सर्वात चवदार भारतीय जेवण. #SonaNewYork’ यासोबतच त्यांनी या पोस्टमध्ये प्रियांका चोप्रालाही टॅग केलं आहे. विशाल भारद्वाज यांच्या या ट्वीटवर प्रियांका चोप्रानं प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलं, ‘तुम्हाला हे आवडलं याचा मला आनंद झाला. तुमचं या ठिकाणी कधीही स्वागत आहे.’

आणखी वाचा- घटस्फोटानंतर ४ महिन्यातच प्रसिद्ध अभिनेता पुन्हा चढणार बोहल्यावर, होणाऱ्या पत्नीनं घातलीय ‘ही’ अट

दरम्यान प्रियांका चोप्रा काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. तिनं जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली होती. निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांनी सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला आहे. प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटात, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘सीटाडेल’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘एन्डिंग थिंग्स’ हे हॉलिवूड चित्रपटही आहेत.