scorecardresearch

प्रियंका चोप्राने पती निक जोनसच्या ३० व्या वाढदिवशी केली भावनिक पोस्ट; पहा व्हिडीओ

पार्टीमधल्या फोटोंचा व्हिडीओ प्रियंकाने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

प्रियंका चोप्राने पती निक जोनसच्या ३० व्या वाढदिवशी केली भावनिक पोस्ट; पहा व्हिडीओ
प्रियंकाने पोस्ट केलेला व्हिडीओ रिशेअर करत निकचे सर्वांचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री प्रियंका चोप्राने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर ती अमेरिकेला गेली. तिने हॉलिवूडमध्येही नाव कमावले. २०१८ मध्ये तिने अमेरिकन अभिनेता-गायक निक जोनसशी लग्न केले. तिने नुकतीच निकच्या ३० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला निकचे आई-वडील, त्याचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. त्याला गोल्फ हा खेळ आवडतो म्हणून प्रियंकाने पार्टीची थीम गोल्फ खेळाशी निगडीत ठेवली होती. तिने पार्टीसाठी गोल्फ मैदानाची जागा निवडली होती. सर्वांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. केक आणि इतर खाद्यपदार्थ देखील थीमला शोभतील अशा प्रकारे बनवण्यात आले होते.

या पार्टीमधल्या फोटोंचा व्हिडीओ प्रियंकाने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने या व्हिडीओला “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या जिवलगा. तुझ्या आयुष्यात आनंद आणि चेहऱ्यावर हसू कायम राहो अशी मी प्रार्थना करते. निक जोनस तुला खूप प्रेम. हा आठवडा माझ्यासाठी खास होता. या सर्वाची सुरुवात निकचा वाढदिवस कसा साजरा करायचा या विचाराने झाली होती. सर्वकाही सुरळीतपणे पार पडले. निकच्या परिवारामुळे, त्याच्या जवळच्या मित्रांमुळे हा आठवडा आनंदात गेला”, असे भावनिक कॅप्शन दिले आहे. स्कॉट्सडेल नॅशनल गोल्फच्या मैदानावर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला परवानगी दिल्याबद्दल प्रियंकाने या गोल्फ क्लबच्या अधिकाऱ्याचेही आभार मानले आहेत.

प्रियंकाने पोस्ट केलेला व्हिडीओ रिशेअर करत निकने पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांना धन्यवाद म्हटले आहे. “स्कॉट्सडेल गोल्फ क्लब या माझ्या आवडत्या जागी माझा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. खास दिवशी दिलेल्या या खास गिफ्टसाठी मी प्रियंकाचा आभारी आहे. प्रियंका तू खरा खजिना आहेस. दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद”, या शब्दांमध्ये त्याने मनातील भाव व्यक्त केले आहेत.

आणखी वाचा – “…आणि लग्नानंतर सगळंच बदललं,” रणबीर कपूरने केला आलियाशी असलेल्या नात्याविषयी खुलासा

या जोडप्याने सरोगसीच्या मदतीने एका मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव त्यांनी ‘मालती मेरी’ असे ठेवले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra shared a video of husband nick jonas 30th birthday celebration yps

ताज्या बातम्या