प्रियांकाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचे सत्य

प्रियांका बिंधास्तपणे एका व्यक्तीला किस करत असल्याचे फोटोंमध्ये पाहावयास मिळते.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थानी आहे. मेहनत आणि अपार कष्टांच्या बळावर तिने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आजच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ती गणली जाते. मात्र, आता ही अभिनेत्री वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. प्रियांकाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘कर्ण मोठा झाला की प्रोब्लेम येणारच’; ‘आपला माणूस’चा धमाकेदार ट्रेलर

न्यूयॉर्कमधील रस्त्यावर प्रियांका बिंधास्तपणे एका व्यक्तीला किस करत असल्याचे फोटोंमध्ये पाहावयास मिळते. पण हे फोटो खरे नसून त्यामागे काही वेगळेच सत्य आहे. नुकतीच ‘क्वांटिको’च्या तिसऱ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. याच मालिकेच्या सेटवर प्रियांका तिच्या सहकलाकाराला किस करताना दिसली. खरंतर हा मालिकेच्या चित्रीकरणातीलच एक भाग असून, प्रियांकासोबत असलेला व्यक्ती अभिनेता एलन पॉवेल आहे.

वाचा : घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?

‘क्वांटिको’च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनचा भाग राहिलेली प्रियांका यात एफबीआयमधून सीआयए एजन्ट झालेल्या अॅलेक्स पेरिशची भूमिका साकारत आहे. २०१५ पासून ती या मालिकेमुळे अधिकच चर्चेत आली. याच मालिकेमुळे प्रियांकाने दोनदा पीपल्स चॉइस पुरस्कारावर आपले नाव कोरले. गेल्याचवर्षी तिने ‘बेवॉच’ चित्रपटाने हॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले. यात ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉकसोबत ती प्रमुख भूमिकेत झळकली.

https://www.instagram.com/p/BeFduXaFAGg/

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priyanka chopra shares a heated kiss with her quantico 3 co star alan powell on the streets of new york city