scorecardresearch

प्रियांका चोप्राने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा, आजीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली “जेव्हा माझे आई आणि वडील…”

तिने तिच्या आजीच्या वाढदिवसानिमित्ताने हे फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा ही नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्रियांका आणि निक अनेकदा त्यांचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच प्रियांकाने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने तिच्या आजीच्या वाढदिवसानिमित्ताने हे फोटो शेअर केले आहे.

प्रियांकाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या बालपणीचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने जांभळ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. यातील एका फोटोत ती, तिची आई मधू चोप्रा आणि बहिण प्रियम माथूर तिच्या आजीसोबत गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियांका ही तिच्या आजीला केक भरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियांकाने हे फोटो पोस्ट करत त्याला फार भावूक कॅप्शन दिले आहे. “आज आम्ही सर्वजण माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करत आहोत. माझ्या संगोपनात आणि जडघडणीत तिचा फार मोठा वाटा आहे. जेव्हा माझे आई आणि वडील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत होते, त्यांचे करिअर करत होते. त्यावेळी माझ्या आजीनेच मला वाढवलं. आमच्या कुटुंबाची काळजी घेतली.”

“मला कायम साथ देणाऱ्या आणि माझ्यावर माया करणाऱ्या अनेक स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आजी मी तुझी फार आभारी आहे. तुझी नेहमीच मला आठवण येते, असे प्रियांकाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच प्रियांकाने तिची बहिण प्रियम माथूर हिचे कौतुक केले आहे. तू नेहमीप्रमाणेच गोड दिसत आहे”, असेही तिने म्हटले आहे.

प्रियांका चोप्राच्या या फोटोंना आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक कमेंटही पाहायला मिळत आहेत. तसेच तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरलही होताना दिसत आहे. सध्या प्रियांका चोप्रा ही अभिनेता फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यासोबतच प्रियांका ही ‘द सिक्रेट डॉटर’ या चित्रपटातही काम करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra shares childhood photo with nani says feels lucky to have strong maternal figures in life nrp

ताज्या बातम्या