बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचवेळा प्रियांकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रियांकाचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ तिच्या फॅनक्लबने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओत प्रियांकाच्या घरी असलेल्या दिवाळी पूजेचा आहे. पण या व्हिडीओत प्रियांका दिवाळीची पूजा ही पती निकसोबत नाही तर तिच्या मोलकरणीसोबत करत आहे. प्रियांकाने तिच्या घरात असलेल्या पूजेत फक्त कुटुंबाला नाही तर मोलकरणीला देखील सामिल केले. त्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.

priyanka chopra nick jonas attended mannara chopra birthday
Video: प्रियांका चोप्रा पती निक जोनससह पोहोचली बहिणीच्या वाढदिवसाला, ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ
Parineeti Chopra shared photo related pregnancy rumors
परिणीती चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…
akshay kumar stepped on alaya F dress video viral
भर कार्यक्रमात अक्षय कुमारने ठेवला प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन् तिने केलं असं काही…, व्हिडीओ व्हायरल
prithvik pratap, sayali sanjeev, suhas sirsat will play role in Dia Mirza new short film panha
दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची वर्णी, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यासह झळकणार ‘ही’ अभिनेत्री

आणखी वाचा : सारा तेंडुलकर आणि शुभमन गील एकत्र बीचवर? दोघांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चा

दरम्यान, प्रियांकाने या पूजेतले काही फोटो दिवाळीत शेअर केले होते. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती पती निक जोनससोबत पूजा करताना दिसत आहे. या व्हिडीओत प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे तर निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

आणखी वाचा : झुलन गोस्वामींच्या बायोपिकमधून अनुष्का करणार कमबॅक, पण टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…

प्रियांकाचा ‘The Matrix: Resurrections’ हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटातील तिच्या स्क्रिन टायमिंगवरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.