बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. यानंतर प्रियांका सातत्याने चर्चेत आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती विविध चित्रपटांसह तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. प्रियांकाने नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने तिला मुंबईची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
प्रियांकाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नाश्ताच्या प्लेटचा फोटो शेअर केला आहे. यात तिची प्लेट ही भारतीय खाद्यपदार्थांनी भरलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच तिने तिला मुंबईची आठवण येत असल्याचेही सांगितले आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोत तिने नाश्त्यासाठी कांदेपोहे मागवल्याचे दिसत आहे. या पोह्यांनी भरलेल्या प्लेटचा फोटो शेअर करत ती म्हणाली, “LA मध्ये पोहे. ज्याने मला मुंबईची आठवण करुन दिली. धन्यवाद….” त्यासोबत तिने हार्ट आणि हात जोडलेला इमोजीही शेअर केला आहे.

दरम्यान प्रियांका चोप्राला भारतीय खाद्यपदार्थ खाण्यास खूप आवडतात. ती त्याची विशेष चाहती आहे. लोणचे आणि कढी पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटते. काही महिन्यांपूर्वी प्रियांकाने एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिने म्हटले होते की, न्यूयॉर्कमध्ये तिचे ‘सोना’ नावाचे तिचे स्वतःचे रेस्टॉरंट देखील आहे, जिथे ती अनेकदा भारतीय पदार्थांचा आस्वाद घेत असते.
काही दिवसांपूर्वीच प्रियांका ही पती निक जोनससोबत जेवण्यासाठी गेली होती. यावेळी निकचा भाऊ केविनही त्याच्यासोबत दिसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. प्रियांका चोप्राच्या या रेस्टॉरंटमध्ये पूर्णपणे भारतीय पदार्थ बनवले जातात. त्या ठिकाणी भारतीयांचे आवडते जेवण दिले जाते. पाणीपुरी ते वडापाव, डोसा, समोसा, कुलचा असे सर्वच पदार्थ तिच्या मेन्यूमध्ये आहेत.