‘भारत’साठी एकही रुपया न घेता काम करणार प्रियांका!

ग्लोबल स्टार झालेल्या प्रियांकानं या चित्रपटासाठी तब्बल १४ कोटींचं मानधन आकारल्याचं म्हटलं जातं होतं. बॉलिवूड अभिनेत्रीला मिळणारं हे सर्वात मोठं मानधन होतं.

priyanka chopra
प्रियांका चोप्रा, priyanka chopra

‘क्वांटिको’चं शुटिंग संपवून प्रियांका भारतात परतली आहे. लवकरच सलमानसोबत ती ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे. आता ग्लोबल स्टार झालेल्या प्रियांकानं या चित्रपटासाठी तब्बल १४ कोटींचं मानधन आकारल्याचं म्हटलं जातं होतं. बॉलिवूड अभिनेत्रीला मिळणारं हे सर्वात मोठं मानधन होतं. पण बॉलिवूडमधल्या काही सुत्रांच्या माहितीनुसार प्रियांकानं या चित्रपटासाठी एकही रुपया न आकारता मोफत काम करण्याचं ठरवलं आहे.

..’हा’ आहे प्रियांकाचा ‘फेव्हेरट मॅन’

अली अब्बास जाफर ‘भारत’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. प्रियांका आणि जाफर यांच्यात मैत्रीचं नातं आहे, आणि याच नात्यामुळे प्रियांकानं कोट्यवधीचं मानधन नाकारल्याचं समजत आहे. त्यामुळे जाफर यांच्या बिग बजेट सिनेमात प्रियांका मोफत काम करणार असल्याचं ‘बॉलिवूड हंगामा’नं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या टीमनं या चित्रपटासाठी १४ कोटीचं मानधन ठरवलं होतं. बऱ्याच चर्चानंतर प्रियांकाला १४ कोटींऐवजी १२ कोटींचं मानधन देण्याचं ठरलं होतं. मात्र आता प्रियांकानं मैत्री खातर कोट्यवधीचं मानधन नाकारलं आहे. मानधन न घेता मोफत काम करणारी प्रियांका बॉलिवूडमधली काही पहिली अभिनेत्री नाही याआधी सलमान, करिनानं देखील मानधन न घेता काम केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka wont charge fee for upcoming film bharat