फोटोग्राफीच्या नादात रविना टंडन अडचणीत? व्याघ्र प्रकल्पातील 'तो' Video समोर आल्यानंतर तपास सुरु; जाणून घ्या घडलंय काय | Probe launched after Raveena Tandon safari video shows her too close to tiger scsg 91 | Loksatta

फोटोग्राफीच्या नादात रविना टंडन अडचणीत? व्याघ्र प्रकल्पातील ‘तो’ Video समोर आल्यानंतर तपास सुरु; जाणून घ्या घडलंय काय

रविनानेच पोस्ट केलेल्या व्हिडीओनंतर या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेत

फोटोग्राफीच्या नादात रविना टंडन अडचणीत? व्याघ्र प्रकल्पातील ‘तो’ Video समोर आल्यानंतर तपास सुरु; जाणून घ्या घडलंय काय
रविनानेच पोस्ट केला व्हिडीओ (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री रविना टंडन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अडचणीचं कारण ठरणार आहे नुकतीच तीने केलेली ताडोबाची सैर. सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्रामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविनाने नियमांचं उल्लंघन करुन सफारीदरम्यान वाघांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये तपास सुरु करण्यात आला आहे.

रविनाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती प्रवास करत असलेल्या टायगर सफारीची जीप वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेरा शटर्सचे फोटो काढताना होणारे आवाजही येत आहे. अचानक हा वाघ या जीपकडे पाहून डरकाळी फोडतानाही दिसतोय.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी मंगळवारी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास कुरु केला आहे. धीरज यांनी दिलेल्या माहितीनुसार रविना २२ नोव्हेंबर रोजी जंगल सफारीसाठी आली होती. वाघ पाहण्यासाठी जंगलामधून जीपने फिरताना तिची जीप वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली. आता या प्रकरणामध्ये वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. तसेच त्यांची चौकशीही केली जाणार आहे.

रविनाने आपल्या या सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान तिने काढलेले वाघाचे फोटोही ट्वीट केले आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला रविवाने भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. यावेळी तिने काही लोक वाघाच्या पिंजऱ्यामध्ये दगड फेकत असल्याची तक्रार केली आहे. रविनाने यासंदर्भात ट्वीट केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 08:07 IST
Next Story
“एकाही व्यक्तीने मी खोटं सांगितल्याचं सिद्ध केलं तर…”, विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा, म्हणाले “आता मी काश्मीर फाइल्सचा…”