scorecardresearch

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, पतीचा फोटो शेअर करत म्हणाली “तुझ्यासारखी व्यक्ती…”

दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, पतीचा फोटो शेअर करत म्हणाली “तुझ्यासारखी व्यक्ती…”

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी विवाहबंधनात अडकली आहे. तिने निर्माता रविंद्र चंद्रशेखरन याच्यासोबत सप्तपदी घेतली आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्या दोघांनी लगीनगाठ बांधली. त्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महालक्ष्मीने तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. यात तिने हिरवा रंगाचा ब्लाऊज आणि छान पारंपारिक ज्वेलरी परिधान केली आहे. तर रविंद्रने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि लूंगी परिधान केला आहे. ते दोघेही यावेळी पारंपारिक दाक्षिणात्य लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने फार हटके कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “पुणे मेट्रो पूर्ण होईल अन्…” सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. तू माझे पूर्ण आयुष्य प्रेमाने व्यापून टाकले आहेस”, असे कॅप्शन महालक्ष्मीने दिले आहे. तिचे हे फोटो आणि कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अभिनेत्री महालक्ष्मी आणि निर्माता रविंद्र चंद्रशेखरन यांनी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतली.

आणखी वाचा : “माझ्यासाठी कार ही…”, गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत तेजस्विनी पंडितने खरेदी केली नवी कोरी गाडी

दरम्यान रविंद्र चंद्रशेखरन हा तमिळ चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तो चेन्नईचा रहिवासी असून गेल्या बऱ्याच वर्षापासून चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहे. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने स्वत:चे लिब्रा प्रोडक्शन्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. ‘सुत्ता कधई या चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे.

तर महालक्ष्मी ही तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. व्हिडीओ जॉकी म्हणून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक प्रसिद्ध टीव्ही सीरियलमध्ये काम केले. तसेच सध्या ती तमिळ चित्रपटांमध्ये झळकताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Producer ravindar serial actress mahalakshmi marriage photos viral nrp

ताज्या बातम्या