"माझी फसवणूक केली अन्..." बॉलिवूड निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय? | producer suneel darshan accuses actor sunny deol says he cheating on me and say no to my film see details | Loksatta

“माझी फसवणूक केली अन्…” बॉलिवूड निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

अभिनेता सनी देओलवर बॉलिवूड निर्माते सुनील दर्शन यांनी काही आरोप केले आहेत. यामुळे सनी देओल चर्चेत आला आहे.

Producer Suneel Darshan sunny deol
अभिनेता सनी देओलवर बॉलिवूड निर्माते सुनील दर्शन यांनी काही आरोप केले आहेत. यामुळे सनी देओल चर्चेत आला आहे.

अभिनेता सनी देओल सध्या ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’, ‘गदर २’ या चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र आहे. नव्या भूमिकांसह तो चित्रपटांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सनी देओलच्या चित्रपटांच्या चर्चा सुरु असताना त्याच्याबाबत एक नवं प्रकरण समोर आलं आहे. बॉलिवूड निर्माते सुनील दर्शन यांनी सनी देओलवर काही आरोप केले आहेत. सनीने आपली फसवणूक केलं असल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

आणखी वाचा – “कन्नड चित्रपटसृष्टी संपुष्टात येणार होती पण…” महेश मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य

नेमकं प्रकरण काय?
आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील दर्शन यांनी सनी देओलवर काही आरोप केले आहेत. सनी देओल मुख्य भूमिका साकारत असलेला चित्रपट मनासारखा एटिड न करता प्रदर्शित करण्याची वेळ सुनील दर्शन यांच्यावर आली. कारण सनी देओल मध्येच भारत सोडून लंडनला गेला तो लवकर परतलाच नाही.

ते म्हणाले, “करिअरच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी त्याला मदत करेन असं वचन देण्यास सनी देओलने मला भाग पाडलं. यामध्येच माझं पूर्ण एक वर्ष गेलं. मी तुमच्या पुढील चित्रपटामध्ये काम करेन असं त्याने मला वचन दिलं होतं. तो चित्रपट सनी देओलने साईनदेखील केला. तसेच या चित्रपटासाठी त्याने पैसेसुद्धा घेतले.” सनी भारतात परतल्यानंतर आपल्या चित्रपटामध्ये काम करणार असं सुनील यांना वाटत होतं.

आणखी वाचा – Video : ‘देवमाणूस’ पुन्हा येतोय! आता हिंदीमध्ये मालिका प्रसारित होणार, नवा प्रोमो व्हायरल

सनी देओलने त्यांच्या चित्रपटामध्ये काम न करता वेगळंच कारण दिलं. सुनील यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाच्या विषयावर काम करण्याची गरज आहे म्हणत सनी देओलने त्यांचा चित्रपट नाकारला. म्हणूनच आपली फसवणूक झाली असल्याचं सुनील यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं. पण यावेळी तो चित्रपट नेमका कोणता? याबाबत बोलणं त्यांनी टाळलं. काही रिपोर्टनुसार, ‘जानवर’ असं या चित्रपटाचं नाव होतं. नंतर या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने काम केलं. सनी आणि सुनील यांनी आजवर ‘अजय’, ‘लूटेरे’ और ‘इंतकाम’ सारखे चित्रपट एकत्र केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2022 at 14:14 IST
Next Story
वैभव मांगलेचा ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला रामराम, जाणून घ्या कारण…