रिलेशनमध्ये असल्याचा अभिमान; नावासंदर्भात मात्र तापसीचे मौन!

सध्या तापसी तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिल्लीला आहे.

तापसी पन्नू,taapsee pannu
तापसी पन्नू

अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींची नावं कोणा ना कोणा व्यक्तीसोबत जोडली जातात. मात्र, अशा कमीच अभिनेत्री असतील ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांच्या कामामुळे ओळखल्या जातात. दाक्षिणात्य चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तापसी पन्नू ही त्यांपैकीच एक. मात्र, काही दिवसांपूर्वीच तापसी आणि डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू मॅथियस बोए यांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सध्या तापसी तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिल्लीला आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता बॅडमिंटनपटू मॅथियस हा देखील दिल्लीमध्येच आहे. मॅथियस बॅडमिंटनच्या खुल्या सुपर सीरिज स्पर्धेसाठी दिल्लीत आल्याने या दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच तापसीने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नातेसंबंधावर भाष्य केले. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीचे नाव न घेता मी त्याच्यासोबत खूप खूश असल्याचे सांगितले. मात्र, मॅथियसच तो व्यक्ती आहे का? याचा तिने उलगडा केलेला नाही.

तापसी म्हणाली की, मी माझ्या वैयक्त्तिक आयुष्यात समाधानी आहे. मला रिलेशनशिपबद्दल उघडपणे बोलण्याची कोणतीही लाज वाटत नाही. पण मी जर खुलपणाने माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलले तर लोकांचे लक्ष यावरच जास्त केंद्रित होईल. मात्र, माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा मी केलेल्या कामाची चर्चा व्हावी, असे मला वाटते. त्यामुळेच मी या गोष्टी जगजाहीर करत नाही, असे तापसीने सांगितले. तापसीने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीचे नाव सांगणे टाळले असले तरी, त्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असण्याचा अभिमान वाटत असल्याचे तिने म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Proud of my relationship status and the person im with says naam shabana actress taapsee pannu

ताज्या बातम्या