पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयांचा संताप अनावर झाला आहे. बॉलिवूडमधूनही या हल्ल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सिनेकामगार संघटनेने केली आहे.

दुपारी २ ते ४ या वेळेमध्ये संपूर्ण चित्रपटनगरी बंद ठेवण्यात येणार असून कलाकार, निर्माते आणि कामगार पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेध करणार आहेत. या वेळामध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण, पोस्ट प्रोडक्शन तसेच एडिटिंगची कामे करण्यात येणार नसल्याचं सिनेकामगार संघटनेने सांगितलं आहे.

दरम्यान, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉइज’ (एफडब्लूआयसीई) १७ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहे. त्यासोबतच या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत ‘ब्लॅक डे’ पाळला जाणार आहे.