Pune Bhor Nasrapur Case Ankita Walawalkar Reaction : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. ६५ वर्षांच्या एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या निरागस मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्दयी हत्या केली आहे. मनोरंजन विश्वातील अनेकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. अशातच आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिनेसुद्धा याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अंकिता सोशल मीडियावर खूप स्क्रिय असते आणि समाजत घडणाऱ्या अनेक घडामोडींबद्दल प्रतिक्रिया देत असते. अशातच आता तिने पुण्यात चिमुकलीबरोबर घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल संताप व्यक्त करत गुन्हेगाराला कठो शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अंकिताने व्यक्त केला संताप

अंकिता व्हिडीओ शेअर करत यामधून म्हणाली, “सगळ्यांनाच माहीत झालं असेल की पुण्यात काय घटना घडली आहे. त्या घटनेमध्ये एका साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षांच्या म्हाताऱ्याने बलात्कार करुन तिचा खून केला आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली ही काही पहिली घटना नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. महाराष्ट्रात पूर्वी महाराजांच्या काळात जेव्हा असं काही व्हायचं तेव्हा महाराज त्या व्यक्तीचे हात छाटूण टाकायचे कारण की ही वृत्ती संपणं गरजेचं आहे आणि आपण काय करतोय अशा घटना घडल्यानंतर फक्त मोर्चे काढतोय, निषेध करतोय आणि न्याय मागतोय. पण न्याय काही आपल्याला मिळत नाहीये.”

अंकिता पुढे म्हणाली, “यावेळी मला फक्त सरकारला आणि विरोधी पक्षालासुद्धा एकच विनंती करायची आहे. कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल घडवायचा असेल तर ठोस कायदा असणं गरजेचं आहे. आपल्याकडे आताही कायदे आहेत पण, त्याच्या तितकेच पळवाटा आहेत आणि त्यामुळे या अशा गोष्टी घडतात. कारण ती व्यक्ती पूर्वीसुद्धा अशाच गोष्टीमधून बाहेर आलेली आणि आता पुन्हा त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे. ज्या मुलीने जगही पाहिलं नव्हतं तिच्याबरोबर इतकी वाईट घटना घडली असेल विचार कला तिच्या आई-वडिलांचं काय झालं असेल हा विचारही करू शकत नाही इतका त्यांना त्रास होत असेल. त्यामुळे ठोस कायदा येणं गरजेचं आहे. ज्यामुळे भीती निर्माण होईल आणि त्यामुळे अशा कृती घडणं बंद होईल.”

अंकिता पुढे म्हणाली, “मी एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करेन की एक ठोस कायदा आम्हाला हवा आहे. आरक्षण आम्हाला द्या तेही आम्हाला हवं आहे पण त्याचबरोबर एक गंभीर कायदा असणं ज्याने लोक थरथर कापतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि तो जो कोणी व्यक्ती आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. ६५ वर्षांचा आहे म्हणून वयाचा मान राखुण त्याला तुरुंगात पोसत बसू नका. महाराजांच्या काळात जे शक्य होतं तसं अगदीच हात छाटणं तुम्हाला शक्य नसेल ना तर ती वृत्ती छाटणं गरजेचं आहे.”