१३ वर्षीय मुलीची अभिनेता राजेश श्रृंगारपुरेला अनोखी भेट

तिची ही भेट पाहून राजेशही भावूक झाला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राजेश श्रुंगारपुरे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. सध्या राजेश श्रृंगारपुरे हा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत ‘मल्हारराव होळकर’ यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. नुकतंच राजेश श्रृंगारपुरेला त्याच्या एका १३ वर्षीय चाहतीने अनोखी भेट दिली आहे. तिची ही भेट पाहून राजेशही भावूक झाला आहे.

राजस्थानमध्ये राहणारी एका १३ वर्षीय मुलगी अभिनेता राजेश श्रृंगारपुरे याची चाहती आहे. या मुलीने त्याच्यासाठी खास भेटवस्तू तयार केली आहे. त्या मुलीने राजेश श्रृंगारपुरे साकारत असलेल्या मल्हारराव होळकर भूमिकेचे अनेक फोटो एकत्र केले आहे. हे सर्व फोटो तिने उशीवर छापले आहेत. त्यानंतर तिने ही उशी त्याला भेट म्हणून चित्रिकरणाच्या सेटवर पाठवली.

हेही वाचा : ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतून ‘शेवंता’ घेणार एक्झिट?

राजेश हा नेहमीप्रमाणे मालिकेच्या चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचला. त्यावेळी त्याला अचानक ती भेटवस्तू मिळाली. ती पाहून तो थक्क झाला. ही भेटवस्तू पाहून तो भावूक झाला. ही भेट पाहून राजेश श्रृंगारपुरे म्हणाला, “ही भेटवस्तू पाहून मी भावूक झालो आहे. केवळ एका १३ वर्षीय मुलीने खासकरुन माझ्यासाठी तिचा अमूल्य वेळ खर्च केला. त्यानंतर माझ्या चित्रांद्वारे इतकी सुंदर भेटवस्तूची निर्मिती केली. मी आयुष्यभरासाठी हा क्षण लक्षात ठेवेन,” असे त्याने सांगितले.

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही ऐतिहासिक मालिका चांगलीच चर्चेत आहे. १८ व्या शतकात सामाजिक बंधनांविरोधातील संघर्षात सर्व अडचणींवर त्यांनी मात केली व यासाठी त्यांना सासरे मल्हारराव होळकर यांची साथ मिळाली. या मालिकेत मल्हाररावांची भूमिका अभिनेता राजेश श्रुंगारपुरे साकारत आहे. त्यासाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Punya shlok ahilyabai actor rajesh shringarpure gets gift from 13 year old fan from rajasthan nrp

ताज्या बातम्या