छोट्या पडद्यावरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. आज जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी मालिकेतील कलाकार एकत्र आले आहेत. त्या सगळ्यांनी सेटच्या परिसरात रोपट्यांची लागवड केली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मालिकेतील कलाकार ऐताशा संसगिरी, गौरव अमलानी, स्नेहलता वसईकर आणि वल्लरी विराज जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत. आपल्या ग्रहाची जपणूक किती महत्त्वाची आहे, याबाबत जागरुकतेसाठी हे पाऊल उचलण्यात आले. हीच आजच्या घडीची गरज आहे. एकत्र येऊन आपण धरतीमातेचे संरक्षण करू शकतो. कारण हरित भविष्य हेच समृद्ध भवितव्य आहे. ‘इच वन प्लांट वन’ (Each One Plant One) म्हणजेच प्रत्येकाने एकतरी रोपटे लावावे हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर, वसुंधरा दिन हा केवळ कॅलेंडरमधील एका तारखेपुरताच मर्यादित न ठेवता मानवजातीला मातृग्रहाविषयी आपल्या जबाबदारींची जाणीव करून देण्याबाबतचे एक आश्वासक पाऊलही असेल.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

आणखी वाचा : “हे वैयक्तिक मत आहे…”, अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणने केलेले वक्तव्य चर्चेत

या सर्वांच्या वतीने ऐताशाने सांगितले की, “यंदाच्या वसुंधरा दिनी लोकांनी विश्वाप्रती जास्त आस्था बाळगावी असा आमचा प्रयत्न होता. ती म्हणाली, “जेव्हाही वसुंधरा दिन येतो आपण त्याची तितकीशी दखल घेत नाहीत. इतर कुठल्याही दिवसासारखे आपण त्याकडे बघतो. यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. आपण आपल्या धरतीमातेबाबत जास्त आस्था दाखवण्याची आवश्यकता आहे. या धरतीने आपल्याला खूप काही देणं दिलं आहे. त्यातील कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहणारी नाही. यामुळे जबाबदार नागरिक म्हणून तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. तंत्रज्ञानामुळे आज आपले जीवन अधिक सुखकर झाले आहे. त्याचवेळी आपण त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहायला नको. कारण त्याचा पर्यावरणावर प्रचंड दुष्परिणाम होत आहे.”

आणखी वाचा : फोटोग्राफर्सकडून धक्का लागल्याने संतापली सारा अली खान, म्हणाली…

आणखी वाचा : सलमानच्या ‘या’ चित्रपटातून श्रेयस तळपदेचा पत्ता कट, मेहूणा आयुष शर्माची एण्ट्री

पुढे ऐताशा म्हणाली, “ते आपल्या ग्रहाला गुदमरून टाकत आहे. यंदाच्या वसुंधरा दिनी आम्ही आमच्या सर्व चाहत्यांना विनंती करू इच्छितो की, आपल्या ग्रहासाठी गुंतवणूक करा. वृक्षारोपणाच्या माध्यमातून, जल संवर्धनातून आणि शक्य तितक्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर टाळून हा मार्ग अवलंबा. यासोबतच तुम्हाला जेव्हाकेव्हा एखादे रोपटे दिसेल अन् तुमच्या पाण्याची बॉटलमध्ये पाणी उरलेले असेल तेव्हा ते पाणी फेकून न देता त्या रोपट्याला घाला. आपली धरिती एकेकाळी हिरवीगार होती, आता हे दृश्य अतिदुर्मिळ झाले आहे. चला तर मग, आपल्या ग्रहाला पुन्हा हिरवेगार करूयात. तसेच आपल्या धरतीमातेला एक सुंदर स्थळ करण्यासाठी मदतीचा हात देऊयात. ‘इच वन प्लांट वन!’ पृथ्वीतलावरचे रहिवासी म्हणून आपण आपली जबाबदारी निभावूयात!” पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिका पाहायला विसरू नका, दर सोमवार ते शुक्रवार रात्री ७: ३० वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर