Pushpa 2 Advance Booking : अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाने केलेल्या जबरदस्त मार्केटिंग आणि प्रमोशनमुळे हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक गाठणार असे बोलले जात आहे. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी अल्लू अर्जुन पटना, चेन्नई कोची आणि मुंबईत या शहरात फिरला आहे. चित्रपटाच्या डिजिटल आणि टेलिव्हिजन हक्कांच्या विक्रीने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून आता हा चित्रपट अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये नवे उच्चांक गाठणार असा अंदाज लावला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि चंदीगडसह प्रमुख शहरांमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू केले आहे. दिल्लीमध्ये या चित्रपटाचे तिकीट १८०० रुपयांना विकले जात आहे.

हेही वाचा…Video : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्याने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद, म्हणाला…

दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या दर पाहून या तिकिटाच्या किमतीची आणि सिनेमाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. तर मुंबई आणि बेंगळुरूमध्ये तिकीटाची कमाल किंमत अनुक्रमे १६०० आणि १००० रुपये आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ५ डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असला तरी, तेलंगणा सरकारने ४ डिसेंबर रोजी रात्री ९:३० पासून चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. या स्पेशल शोचे चाहत्यांना सिंगल स्क्रीनवर तसेच मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, या शोसाठी तिकीट दरात ८०० रुपयांपर्यंत वाढ करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही किंमत फक्त ४ डिसेंबरच्या शोसाठी लागू होईल.

चित्रपटाच्या प्रदर्शना दिवशी, तेलंगणा सरकारने पाच नियमित शोव्यतिरिक्त पहाटे १ वाजता आणि ४ वाजता दोन अतिरिक्त शो घेण्याची परवानगी दिली आहे. या अतिरिक्त शोसाठी सिंगल स्क्रीन थिएटर मालकांना ८ डिसेंबरपर्यंत तिकीट किंमत १५० रुपयांनी वाढवण्याची परवानगी आहे. ९ ते १६ डिसेंबरदरम्यान ही वाढ १०५ रुपये असू शकते आणि १७ ते २३ डिसेंबरदरम्यान तिकीट दर २० रुपयांनी वाढवता येईल. २४ डिसेंबरपासून तिकीट दर सामान्य किंमतींवर येतील.

हेही वाचा…कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…

मल्टिप्लेक्सना ५ ते ८ डिसेंबरदरम्यान तिकीट दर २०० रुपयांनी वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ९ ते १६ डिसेंबरदरम्यान १५० रुपये आणि १७ ते २३ डिसेंबरदरम्यान ५० रुपयांपर्यंत किंमत वाढवता येईल. ही दरवाढ जीएसटीशिवाय आहे.

हेही वाचा…“अंगारो सा…”, अल्लू अर्जुन अन् रश्मिकाचा ‘सुसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पुष्पा-श्रीवल्लीची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले…

सॅकलिंकच्या अहवालानुसार, ‘पुष्पा: द रूल’ ने आतापर्यंत भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे ५०,००० तिकिटांची विक्री केली आहे या बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये १.५१ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचा रन टाइम तीन तास २० मिनिटे आहे आणि त्याला यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘पुष्पा २’ ची भारतासह विविध देशांत चर्चा आहे आणि या चित्रपटाने आत्तापर्यंत जागतिक स्तरावर अॅडव्हान्स बुकिंगमधून ३० कोटी रुपये कमावले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 advance booking most expensive ticket 1800 in delhi check allu arjun new film prices in mumbai psg