Allu Arjun Hospital Video : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज त्याच्या हैदराबाद येथील घरातून पोलिसांनी अटक केली. ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आज अभिनेत्याला अटक केली. अटक केल्यावर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेलं, त्याचा रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे.

अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अल्लू अर्जुन हात जोडताना दिसतोय. अभिनेत्याला आत नेल्यावर तिथे डॉक्टर उभे असलेले दिसत आहेत.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार

हेही वाचा – अल्लू अर्जुनने पत्नीला किस केलं अन् हसत हसत पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला; अभिनेत्याचा अटकेआधीचा Video Viral

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर अनेक चाहते त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. त्याला रुग्णालयात नेलं तेव्हा तिथेही चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. अभिनेत्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Allu Arjun Arrest: ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक; ‘त्या’ घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई!

नेमकं प्रकरण काय?

४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करून चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात नेलं. महिलेच्या मृत्यूची नोंद याच पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Story img Loader