Pushpa 2 Allu Arjun Arrested: तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घडामोडींमुळे चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून आता अल्लू अर्जुनवर काय कारवाई होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. ४ डिसेंबरला घडलेल्या या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. पण तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजू केला आहे.

चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि त्याची टीम संबंधित थिएटरवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी येणार आहे, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आली आहे.

Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
81 Bangladeshi nationals arrested from Mumbai news
मुंबईतून ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक; नववर्षातील पहिल्याच १० दिवसांतील पोलिसांची कारवाई
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
Chandrapur Khalistan supporter arrested
मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण

अल्लू अर्जुनला राहत्या घरातून केली अटक

शुक्रवारी दुपारच्या सुमारास हैदराबाद पोलीस आयुक्तांची टास्क फोर्स आणि चिक्कडपल्ली पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले. त्यांनी तिथून त्याला ताब्यात घेतलं. या अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात अपीलही केलं होतं. पण अद्याप त्याला या प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. अल्लू अर्जुननं केलेली याचिका अद्याप सुनावणीसाठीच आलेली नाही. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Pushpa 2 Premier Hyderabad Stamped: ‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जुनने २५ लाखांच्या मदतीचं दिलं आश्वासन

अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आल्यानंतर चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात नेण्यात आलं आहे. याच पोलीस स्थानकात चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

FIR मध्ये काय म्हटलंय?

या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम १०५ (जीवघेणं कृत्य) आणि कलम ११८ (जाणूनबुजून इतरांच इजा पोहोचवणं) या कलमांची नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. चिक्कपडल्ली पोलीस स्थानकात मृत महिलेच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुष्पा २ च्या प्रीमियरवेळी अल्लू अर्जुन आणि त्याची टीम तिथे आल्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यातून एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारासाठी कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींविरोधात कायद्यात विहीत कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती हैदराबाद पोलिसांचे सेंट्रल झोनचे पोलीस उपायुक्त अक्षांश यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

अल्लू अर्जुनला राहत्या घरातून केली अटक

शुक्रवारी दुपारच्या सुमारास हैदराबाज पोलीस आयुक्तांची टास्क फोर्स आणि चिक्कडपल्ली पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले. त्यांनी तिथून त्याला ताब्यात घेतलं. या अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात अपीलही केलं होतं. पण अद्याप त्याला या प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. अल्लू अर्जुननं केलेली याचिका अद्याप सुनावणीसाठीच आलेली नाही. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

संध्या थिएटर मालकाला आधीच झाली अटक

दरम्यान, हैदराबादमधील ज्या थिएटरमध्ये ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली, त्या संध्या थिएटरच्या मालकाला आणि दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी या प्रकरणी आधीच अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियरच्या वेळी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी थिएटर व्यवस्थापनाकडून कोणतीही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. शिवाय, अल्लू अर्जुनला येण्यासाठी किंवा परत बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती.

नेमकं काय घडलं त्या दिवशी?

४ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अल्लू अर्जुन त्याच्या खासगी सुरक्षा रक्षकांसमवेत संध्या थिएटरवर आला. त्यावेळी त्याच्यासोबत चाहत्यांचा मोठा जमावही थिएटरच्या गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. अल्लू अर्जुनच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी जमावाला दूर लोटण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. यानंतर उसळलेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३९ वर्षी एम. रेवती नावाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेवती यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा मोठा चाहता असल्यामुळे ते सहकुटुंब ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आले होते. पण त्याचवेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये रेवती यांना जीव गमवावा लागला असून त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.

Story img Loader