बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर सगळ्याच स्टार किड्सना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने वडिलांना गर्व वाटावा असे काम केले आहे.

बंगळुरु येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या जलतरण स्पर्धेमध्ये आर माधवनचा मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत.सोशल मीडियावरही नेटकरी ट्वीट करत वेदांतचे अभिनंदन करत आहेत.

What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
MP Supriya Sule On Vanchit Bahujan Aghadi
वंचित बहुजन आघाडी अन् महाविकास आघाडीच्या युतीचे काय झाले? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

द ब्रिजने दिलेल्यानुसार, वेदांतने ८०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, ४×१०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीलेमध्ये कांस्य पदक. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये त्याला रौप्य पदक मिळालं आहे.

आणखी वाचा : Sacred Games: नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडू कोसळलं, कुब्रा सैतने केला खुलासा

आर माधवने बॉलिवूडशिवाय तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटही केले आहेत. ‘रामजी लंदन वाले’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘तनु वेड्स मनु’, ‘3 ईडियट्स’, ‘साला खड़ूस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माधवनच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘द नंबी इफेक्‍ट’ आहे.