‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेत सचित पाटील दिसणार दुहेरी भूमिकेत

मालिकेमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री झाली असून ही भूमिका सचित पाटीलच साकारत आहे.

‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच खुलासे होताना दिसत आहेत. राधा प्रेमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिने अनेक प्रश्न मागे सोडले, घरच्यांसाठी तो एक धक्काच होता. प्रेम त्या धक्क्यामधून कसाबसा सावरत होता आणि तोच देवयानी- दीपिकाने त्याला त्यांच्या जाळ्यात आणि कारस्थानामध्ये पूर्णत: अडकवले. परंतु जसजसे दिवस सरत गेले गुंता, प्रश्न सगळे सुटत गेले. राधा मेली नसून ती जिवंत आहे, तिच्या पोटामध्ये प्रेमचे मुलं वाढत आहे, राधा कधीच विपश्यना केंद्रात गेली नसून ती इंदोरमध्ये एका रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती अश्या अनेक गोष्टी समोर आल्या.

जसाजसा गुंता सुटत गेला प्रेमला राधाविषयीची वाटणारी काळजी वाढत गेली. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत पण राधा अजूनही भेटली नाही ती कुठे आहे याची माहिती अजूनही मिळाली नाही. परंतु या सगळ्यामागे दीपिका आणि देवयानी आहे हे मात्र प्रेमला कळून चुकले. आता मालिकेमध्ये अजून एक ट्वीस्ट आला असून, कश्यप नांदे कोण आहे ? त्याचा राधाशी खरंच काही संबंध होता किंवा आहे का ? असा प्रश्न होते. आता लवकरच प्रेक्षकांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत.

मालिकेमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री झाली असून ही भूमिका सचित पाटीलच साकारत आहे. या भुमिकेमध्ये सचित एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या ढंगात दिसत आहे. या मालिकेतून सचित पाटील पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. दुहेरी भूमिका साकारणं हे नक्की आव्हानात्म आहे असंही सचित म्हणालाआता कश्यप नांदेच्या येण्याने मालिकेमध्ये काय घडणार ? प्रेम आणि राधाच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? देवयानी कश्यपला हाती घेऊन कोणते नवे कारस्थान रचणार? अशा अनेक रंजक गोष्टी यातून लवकरच पाहायला मिळणार आहे. .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Radha pream rangat ragali sachit patil will do double roll