दमदार अभिनय आणि सडेतोड मत मांडून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री राधिका आपटेने एका मुलाखतीत नवा खुलासा केला आहे. ‘देव डी’ या चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये राधिका आपटेला फोन सेक्स करावा लागला. या ऑडिशननंतर मात्र मी असे प्रकार पुन्हा केले नाही, असे तिने म्हटले आहे.

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता राजकुमार राव सहभागी झाले होते. सर्वात विचित्र ऑडिशन कोणती, असा प्रश्न नेहाने राधिकाला विचारला. यावर ती म्हणाली, मी देव डी चित्रपटाच्या ऑडिशनला गेले होते. तिथे ऑडिशनमध्ये मला फोन सेक्स करावा लागला. माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी यापूर्वी कधीही असं केलं नव्हतं. पण तो सीन करताना मजा आली. मात्र, त्या चित्रपटासाठी माझी निवड झाली नाही, असे तिने सांगितले. चित्रपटात माही गिलने जी भूमिका साकारली होती त्यासाठी राधिकाने ऑडिशन दिली होती.
एकता कपूरचा भाऊ तुषार कपूरशी प्रेमसंबंध होते का, असा प्रश्नही तिला विचारण्यात आला. ‘ती बातमी वाचून मला हसायला आलं होतं. पण माझ्याकडे तुषार कपूरचा मोबाईल नंबरही नाही’, असे उत्तर तिने दिले. कोण राधिका आपटे?  असे एकता कपूरने एका मुलाखतीत म्हटले होते. याबाबतही राधिकाला विचारण्यात आले. ‘एकता कपूरने असं का म्हटलं हे मला माहित नाही. पण त्यानंतर आमची भेट झाली होती, त्यावेळी एकता कपूर आणि माझ्यात गप्पा रंगल्या होत्या, असे राधिकाने सांगितले.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप

दरम्यान, राधिका आपटेचा पॅडमॅन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. यानंतर ती सैफ अली खान आणि चित्रांगदा सिंह यांच्यासह एका चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी बिकीनीमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोवरुन तिला ट्रोल देखील करण्यात आले होते. शेवटी राधिकाने ट्रोल करणाऱ्यांनाही सुनावले होते. माझी खिल्ली कोणी उडवली, ते काय करतात याविषयी मला काहीच माहित नाही. कारण मला त्यांच्याशी काही घेणंदेणं नाही. त्यामुळे मुळात मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही, असे तिने म्हटले होते.