न्यूड क्लिप लीक होण्याविषयी राधिका आपटे म्हणते…

‘Clean, Shaven’ चित्रपटाच्या वेळी राधिकाची न्यूड क्लिप व्हायरल झाली होती.

radhika apte

आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटांच्या माध्यमातून राधिकाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर विदेशापर्यंत पोहोचली आहे. पण काही दिवसांपूर्वी राधिकाची एक न्यूड क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता एका मुलाखतमध्ये तिने यावर वक्तव्य केले आहे.

राधिकाने नुकतीच ‘ग्रेझिया मॅगझिन’ला मुलाखत दिली. त्यावेळी तिने न्यूड क्लिप लीक झाल्याचा तिच्यावर परिणाम झाला होता असे म्हटले. ‘Clean, Shaven चित्रपटाच्या वेळी जेव्हा माझी न्यूड क्लिप लीक झाली होती तेव्हा मी प्रचंड ट्रोल झाले होते. मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते. मीडिया माझ्या विषयी काय बोलते म्हणून नाही तर माझा ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिस्ट माझ्याविषयी काय विचार करत असतील म्हणून मी बाहेर पडले नाही’ असे राधिका म्हणाली.

आणखी वाचा : प्रियांकाने बॉयफ्रेंडल कपाटात लपवलं, मावशीने आईला फोन केला अन्…

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

‘परदेशात मजा करतायेत, कोविडसाठी मदत करा’, ट्रोल करणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

पुढे ती म्हणाली, ‘जे फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये मी नाही असा अनेकांनी अंदाज लावला असेल. मला असे वाटत नाही की एखादी व्यक्ती असे करु शकेल किंवा करु ही शकते. या कडे दुर्लक्ष करायला हवे. याकडे लक्ष देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.’

त्यानंतर राधिकाने पार्च्ड चित्रपटात न्यूड सीन देणे तिच्यासाठी किती कठीण होते हे सांगितले आहे. ‘न्यूड सीन देणे सोपे नव्हते कारण त्यावेळी मी माझ्या स्वत: च्या बॉडी इमेजच्या मुद्द्यांशी वाद घालत होते. म्हणून, न्यूड सीन शूट करताना भीती वाटत होती. आता मी हे सर्व कुठेही करु शकतो’ असे राधिका पुढे म्हणाली.

राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी ‘मिसेस अंडरकव्हर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. तसेच ‘ओके कॉम्प्यूटर’ या वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Radhika apte on the time when her nude clip was leaked avb