राधिका आपटेने नुकतंच देवावार तिची श्रद्धा आहे का तसेच या जगात एक कुठलीतरी शक्ती आहे जी तुम्हाला मार्गदर्शन करत असते यावर तुझा विश्वास आहे का असं विचारल्यानंतर तिचा देवावर विश्वास नाहिये असं म्हटलं आहे. यावेळी तिने तिचा कोणावर विश्वास आहे याबद्दलही सांगितलं आहे.
माझा देवावर विश्वास नाही – राधिका आपटे
नेटफ्लिक्सवरील ‘अक्का’ या सीरिजमुळे सध्या चर्चेत असलेल्या राधिका आपटेने या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत तिचा देवावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. फिल्मी ग्यानला दिलेल्या मुलाखतीत ‘अक्का’ सीरिजमध्ये मुख्य भूमकेत असलेली अभिनेत्री किर्ती सुरेशला व तिला तुमचा देवावर विश्वास आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राधिक म्हणाली, “नाही माझा देवावर विश्वास नाहीये. माझा निसर्गावर विश्वास आहे. माझ्यासाठी निसर्ग हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मूर्तीपेक्षा निसर्गावर श्रद्धा ठेवावी”
याचवेळी राधिकाबरोबर उपस्थित असलेली ‘अक्का’ सीरिजमधील तिची सहअभिनेत्री म्हणाली, “हो. जर देवावर विश्वास आहे का असा प्रश्न असेल तर हो. माझा देवावर विश्वास आहे. माझा असा विश्वास आहे की एक कुठली तरी शक्ती आहे. मी आध्यात्मिक आहे. मला जी पद्धत माहीत आहे त्याप्रमाणे मी प्रार्थना करते, पण मी धार्मिक नाहीये. माझा देवावर विश्वास आहे.”
राधिका तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमी तिची मतं ठामपणे व्यक्त करत असते. याच सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने तिला महिला कलाकारांमध्ये भांडणं होतात का असं विचारल्यानंतर एका मुलाखतीत तिने ही एक कालबाह्य गोष्ट आहे आणि महिलांपेक्षा पुरुष याबाबतीत जास्त असुरक्षित असतात असं वाटतं असं उत्तर दिलं होतं.
दरम्यान, किर्ती सुरेश व राधिका आपटे यांची ‘अक्का’ ही सीरिज ३० ऑक्टोबरला नेटफ्लिस्कवर रिलीज होत आहे. यामध्ये राधिका खलनायिकेच्या तर किर्ती नायिकेच्या भूमिकेत असून महिलांचं साम्राज्य असलेल्या परिसरातील ही एक रंजक कथा आहे. त्यामुळे यामध्ये दोन महिलांमधील सत्ता, नियंत्रण मिळवण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
