scorecardresearch

अंबानींची बातच न्यारी! होणाऱ्या धाकट्या सुनेच्या हातातल्या छोट्याशा पर्सने वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल आवाक्

तिच्या पर्सची जेवढी किंमत आहे त्या पैशात एक घर विकत घेता येईल.

radhika merchant

प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी मुलगी होणारी धाकटी सून राधिका मर्चंट सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा अनंत अंबानी त्याच्याशी साखरपुडा झाला. तर ती अंबानी कुटुंबीयांच्या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असते. प्रत्येक कार्यक्रमातील तिची स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेते. तर आता तिच्या हातातली एक छोटीशी पर्स खूप चर्चेत आली आहे.

गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. या उद्घाटन सोहळ्यामध्ये राधिका मर्चंटही आली होती. या उद्घाटन सोहळ्याला तिच्या हातात असलेल्या पर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता या छोट्याशा पर्सची किंमत समोर आली आहे.

आणखी वाचा : मुकेश व नीता अंबानींनी लेकीच्या जुळ्या मुलांना दिली मोठी भेट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला राधिकाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर यावर तिने अगदी नॅचरल मेकअप केला होता. यावेळी तिने अनंतबरोबर फोटोग्राफर्सना पोज दिल्या. या फोटोमध्ये तिच्या हातामध्ये एक छोटीशी पर्स दिसत आहे. ही पर्स एका लक्झरी ब्रँडची आहे. राधिकाच्या हातात असणाऱ्या या छोट्याशा पर्सची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल ५२ लाख आहे. ‘Hermes Kelly Sac Bijou pendant with chain in silver’ असं या पर्स सारख्या दिसणाऱ्या ज्वेलरी पीसचं नाव आहे.

हेही वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल आवाक्

राधिकाची ही पर्स आता चर्चेचा विषय ठरत आहे. या पर्सची किंमत समोर आल्यावर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. दरम्यान राधिकाच्या हातात अनेकदा महागड्या पर्स दिसून येतात. यापूर्वीही तिच्या एका गुलाबी पर्सची अशीच चर्चा रंगली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 12:47 IST

संबंधित बातम्या