पाकिस्तानात आलेल्या महापुराने हाहाकार उडवला असून, मिळेल तेथून मदतीसाठी हा देश याचना करत आहे. आधीच करोना महासाथ, युक्रेन युद्ध, राजकीय अस्थैर्य, आर्थिक धोरणांच्या बाबतीत परिपक्वतेचा अभाव, चीनवर अवाजवी विसंबून राहण्याची सवय, दहशतवाद यांसारख्या अडचणींना देशाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पूरजन्य परिस्थितीमुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानमध्ये हा सर्वात मोठा महापूर आला आहे. यामध्ये बालकांसह १००० जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने आता आणीबाणीची घोषणा केली आहे.

पाकिस्तानची अशी अवस्था असताना तिकडच्या कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मदतीचे आवाहन केले आहे. माहिरा खानने आपल्या ल ट्विटवर अकाउंटवर लिहिलं आहे की, ‘मोठे असो किंवा छोटे जमेल तसे काही करू शकते’. असा कॅप्शन देत तिने पाकिस्तानातील संस्थेच्या ट्विटला पुन्हा रिट्विट केले आहे. तर दुसरीकडे हुमायून सईद याने ट्विट केले आहे की, ‘संपूर्ण पाकिस्तानात मुसळधार पावसाने आणि पुराने परिस्थिती चिंताजनक निर्माण झाली आहे. मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर यावर तोडगा काढा जेणेकरून देशातील माझ्या पीडित भाऊ बहिणींना आराम मिळेल. आपण सर्वमिळून त्यांना मदत करू’. अशा शब्दात कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“पणजीच्या भूमिकेत पणती…” ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील नव्या व्यक्तिरेखेबाबत केदार शिंदेंचा खुलासा

पूरजन्य परिस्थितीवर मदतीचे आवाहन या करणाऱ्या कलाकरांना मात्र चांगले ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहले आहे की, ‘कोणाला दाखवण्यासाठी हे करताय’? तर एकाने लिहले आहे की, ‘तुम्ही जे चित्रपटातून कमवता ते त्यातून का नाही मदत करत’? असा थेट सवाल त्याने केला आहे. तर एकाचे म्हणणे आहे की ‘या परिस्थितीत साकार आपल्याला कोणतीही मदत करू शकत नाही’. एकाने माहिराला थेट सवाल केला आहे की ‘पुरातील लोकांना तुझ्याकडून काय मदत मिळू शकते’?

माहिरा खानने केवळ पाकिस्तानी सिनेसृष्टीत काम न करता बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. किंग खान अर्थात शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात तिने शाहरुखच्या पत्नीचे काम केले आहे. पाकिस्तानातील ‘हमसफर’ या मालिकेतील कामामुळे ती चर्चेत आली. तिला या मालिकेतील भूमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाला होता. २००७ साली तिने अली अस्करी याच्यासोबत विवाह देखील केला होता मात्र २०१५ साली ते विभक्त देखील झाले आहेत.