‘रईस’ चित्रपटात शाहरुख खानबरोबर झळकलेली अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. माहिराने तिचा जवळचा मित्र आणि उद्योगपती सलीम करीम याच्याशी रविवारी (१ ऑक्टोबर रोजी) मूरी इथे एका खासगी विवाहसोहळ्यात लग्न केलं.

“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

लग्नात माहिरा कमालीची सुंदर दिसत आहे. माहिराचा मॅनेजर अनुशय तलहा खानने इन्स्टाग्राम लग्नातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यात वधूच्या वेषात सजलेली माहिरा सलीमकडे चालत जात होती. माहिराला समोरून येताना बघून सलीम आपले अश्रू पुसताना दिसतो. नंतर सलीम चालत माहिराकडे येतो, दोघेही एकमेकांना बघून भावुक होतात. सलीम माहिराच्या कपाळावर किस करतो आणि ते एकमेकांना मिठी मारतात.

माहिरा व सलीमच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहते या नवविवाहीत जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, माहिरा खानचे पहिले लग्न २००७ मध्ये अली अक्सारीशी झाले होते. दोघेही लॉस एंजेलिसमध्ये भेटले होते. अली अक्सारी हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. लग्नानंतर माहिराने २४ व्या वर्षी मुलगा अझलानला जन्म दिला होता. पण लग्नानंतर आठ वर्षांनी २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र मुलाचा ताबा अजूनही माहिराकडे आहे. तिचा मुलगा आता १३ वर्षांचा आहे.

माहिरा व सलीम एकमेकांना डेट करत होते. दोघेही खूप चांगले मित्र होते. माहिराने सलीमला डेट करत असल्याचा खुलासा स्वतःच केला होता. आता ‘रईस’ फेम अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

Story img Loader