Priyanka Chopra comment on Raghav Chadha Post: आम आदमी पार्टीने (AAP) गुरुवारी अचानक एक मोठा निर्णय घेतला. पक्षाने अभिनेत्री परिणिती चोप्राचे पती खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेते पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी आता दुसरे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. “मी शांत झालो आहे, पराभूत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने (AAP) राज्यसभेतील आपल्या गटनेते पदावरून राघव चड्ढा यांना हटवलं. या प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर करून राघव चड्ढा यांनी आपलं मत मांडलं. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

राघव यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी संसदेत जनतेचे विविध प्रश्न कसे मांडले, हे व्हिडीओत सांगितलं. राघव यांची मेहुणी आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली असून कमेंट्समध्ये त्यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे. राघव चड्ढा यांनी प्रियांकाची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्याशी लग्न केलं आहे. अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पाटनी हिने देखील राघव यांना पाठिंबा दिला आहे. “तुम्ही स्वतःचा एक पक्ष काढा,” असा सल्लाही तिने यावेळी दिला.

Award Banner

पाहा व्हिडीओ

या पोस्टवर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘हार्ट आईज’ आणि टाळ्या वाजवणारे इमोजी वापरून कमेंट केली आहे. ती राघव चड्ढा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे या कमेंटमधून दिसून येतं.

Raghav Chadha and Priyanka Chopra support post on Instagram
राघव चड्ढा यांच्या पोस्टवरील प्रियांका चोप्राची कमेंट

राघव चड्ढा यांनी आपल्या पोस्टमध्ये संसदेच्या विविध अधिवेशनांमध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शिक्षण आणि रोजगार यांच्यातील मोठी दरी, ‘एक देश, एक उपचार’ पद्धती, टेलिकॉम कंपन्यांची रिचार्ज संदर्भातील मनमानी आणि भगतसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी यांसारख्या अनेक विषयांचा यात समावेश आहे. राघव यांनी या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना एकत्रित करून एक रील बनवलं आणि ते त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं.