Video: चुलीवरचं जेवण अन् नाना पाटेकरांनी वाढलेली थाळी, राहुल देशपांडेंनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

या व्हिडीओमुळे नाना पाटेकर पाटेकर यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

rahul deshpande, nana patekar, nana patekar video, nana patekar video of serving food, rahul deshpande facebook, राहुल देशपांडे, नाना पाटेकर, नाना पाटेकर व्हिडीओ, नाना पाटेकर चित्रपट, राहुल देशपांडे फेसबुक
नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांना आपल्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. चित्रपट हिंदी असो वा मराठी नाना पाटेकर यांचा अभिनय नेहमीच लक्षात ठेवण्यासारखा असतो. त्यांनी आता पर्यंत बरेच हीट चित्रपट दिलेत. पण एवढी प्रसिद्धी आणि ग्लॅमर क्षेत्रात काम करत असताना नाना पाटेकर यांचा साधेपणा कधीच लपून राहिला नाही. खऱ्या आयुष्यात ते खूप साधेपणानं जगतात आणि आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेताना दिसतात. याची प्रचिती नुकत्याच एका व्हिडीओतून आली.

नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर चुलीजवळ बसलेले दिसत आहेत आणि ते चुलीवर बनवलेलं जेवण वाढून तिथे असलेल्या सर्व माणसांना हक्काने हाक मारून जेवू घालताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- “शाहरुखने अभिनयाचा मॉल उघडलाय आणि आम्ही…” रणवीर सिंगचं वक्तव्य चर्चेत

नाना पाटेकर यांचा हा व्हिडीओ शेअर करताना राहुल देशपांडे यांनी लिहिलं, “मला एके दिवशी असं जगायला आवडेल. नाना तुम्हाला साष्टांग नमस्कार. जेवण अप्रतिम!” राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नाना पाटेकर यांच्या चाहत्यांनी कमेंट करत नानांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसत आहे.

आणखी वाचा- एंबर हर्ड म्हणाली ‘Suck my d***’, जॉनी डेपच्या खासगी संभाषणाची क्लिप न्यायालयात सादर

एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘नाना तुमच्या अशा वागण्यावर ,पाय जमिनीवर घट्ट ठेवून , मनापासून करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत , झोकून देऊन काम करण्याची पद्धत ,नकळत तुमच्या कडे आकर्षित करते.शतश: नमन.’ दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय, ‘व्वा..खरंच असामान्य व्यक्तिमत्व.. खरंय असं जगायला मजा येईल’ तर आणखी एका युजरनं म्हटलंय, ‘नाना ते नानाच. प्रामाणिकपणाने साधेपण जगणं सोपं नाही, आणि नानांशिवाय इतर कोणाला जमणारही नाही.’ इतर अनेक युजर्सनी अशाच आशयाच्या कमेंट करत नाना पाटेकर यांचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul deshpande share nana patekar video of serving food goes viral mrj

Next Story
Raanbaazaar Trailer : “…अन् त्यांच्या कंपनामुळे मोठं वादळ तयार झालं” बहुचर्चित ‘रानबाजार’चा ट्रेलर पाहिलात का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी