‘राहुल सांगतात आणि मोदीजी करतात’, बॉलिवूड लेखकाने शेअर केले राहुल गांधींचे जुने ट्वीट

लेखकाने अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान बॉलिवूड लेखक रामकुमार सिंहने ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रामकुमार यांनी राहुल गांधी यांचे जुने एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये ‘आता तर फक्त दिखावटी बॅरिगेट हटवले आहेत, लवकरच तीनही कृषीविषयक कायदे देखील हटवण्यात येतील. अन्नदाता सत्याग्रह जिंदाबाद’ राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे. हे ट्वीट शेअर करत, ‘राहुल बोलत असतात आणि ते मोदीजी करत असतात. मला शंका आहे की दोघे एमेकांना मिळालेले तर नाहीत ना?’ या आशयाचे कॅप्शन रामकुमार यांनी दिले आहे.

मोदींच्या निर्णयानंतर राहूल गांधी यांनी ट्वीट केले. “देशाच्या अन्नदात्याने केलेल्या सत्याग्रहामुळे अहंकाराची मान झुकली. अन्यायाविरोधातील या विजयासाठी शेतकऱ्यांचं अभिनंदन. ‘जय हिंद, जय हिंद का किसान’!” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपला १४ जानेवारी २०२१ चा आपला एक जुना व्हिडीओ रिट्विट केलाय. यात त्यांनी माझे शब्द लिहून ठेवा सांगत मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील असं म्हटलं होतं.

या व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले होते, “शेतकरी जे करत आहेत त्यावर मला अभिमान आहे. माझा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मी त्यांच्यासोबत उभा आहे. मी माझ्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांचा विषय मांडला. आम्ही यापुढेही हे करतच राहू. माझे शब्द लिहून ठेवा, मोदी सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. मी काय म्हटलोय ते लक्षात ठेवा.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul gandhi old tweet viral on pm modi bollywood writer ramkumar singh tweet avb

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news