गेले आठवडाभर ज्या लग्न सोहळय़ाची ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर धामधूम सुरू आहे तो सोहळा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर अनुभवण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील लोकप्रिय जोडी राज आणि कावेरी आता लग्नबंधनात अडकणार आहेत. मोठय़ा धूमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. त्यांच्या या भव्यदिव्य लग्न सोहळय़ाचा दोन तासांचा विशेष भाग रविवारी, २६ फेब्रुवारीला दुपारी १ आणि संध्या ७ वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार आहे.

राज-कावेरी यांचा विवाह सोहळा आनंदात पार पडणार आहे. लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा साज ल्यायली आहे. नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसते आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळे विधीही पार पडणार आहेत. या खास भागाच्या निमित्ताने मालिकेतील रत्नमाला म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या, ‘‘रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, कारण याच दिवसाची वाट ती कुठे तरी बघत होती. कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत. मालिकेत रत्नमाला आणि राजचं नातंदेखील दृढ झालं आहे. आता मालिकेत राज-कावेरीचं लग्न होणार आहे. सेटवर अगदी आनंदी वातावरण आहे, जय्यत तयारी सुरू झाली आहे. मोहितेंचं घर सकारात्मकतेने, आपल्या माणसांनी, नातेवाईकांनी बहरून जाणार आहे. जितका आनंद आम्हाला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे, कारण तेदेखील या दिवसाची वाट आतुरतेने बघत होते. तेव्हा राज-कावेरीच्या लग्नाला नक्की यायचं हे आमच्याकडून सगळय़ांना आग्रहाचे निमंत्रण आहे.’’

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर