Raj Kundra Case: पोलीस चौकशी सुरु असतानाच राज कुंद्रावर भडकली शिल्पा शेट्टी; पोलिसांना म्हणाली…

शुक्रवारी राज कुंद्राच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकत तपास केला होता.

raj-kundra-arrest-shilpa-shetty
(File Photo)२० जलैला राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली असून अश्लील सिनेमांच्या निर्मितीमध्ये राज कुंद्रा पुरता अडकला आहे. राज कुंद्राच्या विरोधात अनेक पुरावे समोर आल्याने राज कुंद्राच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढू होवू लागली आहे. २३ जुलैच्या सुनावणीनंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला यावेळी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची चौकशी देखील केली.

ईटाइम्सच्या वत्तानुसार अश्लील सिनेमांच्या निर्मितीसंदर्भात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन चौकशी केलीय. या चौकशी दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिल्पाचा पती राज कुंद्रादेखील तिथे उपस्थित होता. यावेळी पोलीस चौकशी दरम्यानच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात तू तू मै मै झाल्याचं वृत्त समोर येतंय. यावेळी शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच भडकली होती. तसचं चौकशी दरम्यान तिला अश्रू आवरणं कठिण झालं. यावेळी कुटुंबाचं नाव खराब नाव खराब केलं शिवाय इतर बिझनेसवरही याचा आता परिणाम होईल असं यावेळी शिल्पा राज कुंद्राला संतापून म्हणाली. यावर आपण पॉर्न सिनेमा बनवले नसून इरॉटिक सिनेमा बनवल्याचं स्पष्टीकरण राजने शिल्पाला दिलं.

हे देखील वाचा: “अश्लील नव्हे तर न्यूड फिल्म बनवायचो”; राज कुंद्रा प्रकरणात चौकशी दरम्यान तनवीर हाशमीचा खुलासा

या चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीने हॉटशॉट या अ‍ॅपवर नेमका काय कंटेट दाखवला जात होता याची कल्पना नसल्याचं म्हंटलं आहे. अश्लील सिनेमा आणि इरॉटिका हे दोन्ही वेगवेगळे असून राजच्या अ‍ॅपवर इरॉटिका म्हणजेच केवळ उत्तेजीत करणारे सिनेमा असल्याचं ती म्हणाली. यावेळी राज कुंद्राचा अश्लील सिनेमाच्या निर्मितीशी संबध नसल्याच शिल्पा म्हणाली.

 

राज कुंद्राच्या घरी पोलिसांचा छापा

शुक्रवारी राज कुंद्राच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकत तपास केला होता. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे. तसंच त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj kundra case mumbai police raid shilpa shetty house shilpa shetty fights with husband raj kundra during police interrogation kpw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी