Pornographic content case: राज कुंद्राच्या ऑफिसमधून मिळालं सर्व्हर, पॉर्न कंटेंट अपलोड केलं जात होतं?

राज कुंद्राच्या अटकेनंतर पोलिसांनी पोर्नोग्राफी प्रकरणाच्या तळाशी जाऊन वेगाने तपास सुरू केलाय. यात एक सर्व्हर जप्त केलं असून डर्टी पिक्चरचा पर्दाफाश होणार असल्याचं बोललं जातंय.

raj-kundra-case-police-seize-server-from-office

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफ‍ी प्रकरणात झालेल्या अटकेनंतर त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार, असं चित्र दिसतंय. राज कुंद्राला अटक केल्यानंतर पोलिसांनी पोर्नोग्राफी प्रकरणाच्या तळाशी जाऊन वेगाने तपास सुरू केलाय. या प्रकरणात पोलिसांनी नुकतंच राज कुंद्रा याच्या ऑफिसमधून एक सर्व्हर जप्त केलाय. याच सर्व्हरच्या माध्यमातून अ‍ॅप आणि इतर वेबसाईट्सवर पोर्नोग्राफ‍िक क्लिप्स अपलोड केल्या जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. आयटी प्रोफेशनल्सच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

राज कुंद्रा याच्या ऑफिसमध्ये मिळालेलं हे सर्व्हर या प्रकरणातील पोर्नोग्राफी प्रकरणातील डर्टी पिक्चरची पाळंमुळं खोदणार, असं देखील बोललं जातंय. या तपासात सर्व्हर व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी दोन मोबाईल जप्त केले आहेत. हे दोन्ही मोबाईल आणि सर्व्हर फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. पोलिसांनी जप्त केलेले हे डिजीटल पुरावे राज कुंद्रा याचा पर्दाफाश करण्यासाठी मदतीचे ठरणार आहेत, असं देखील पोलिसांकडून सांगण्यात येतंय.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून केली जात होती चर्चा

राज कुंद्रा याच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. राज कुंद्रा आणि त्याची टीम ‘H अकाउंट’च्या नावाने एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप चालवत होते. राज कुंद्रा स्वतः या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपचा अ‍ॅडमिन आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये एकूण चार सदस्य होते. या ग्रूपमध्ये मॉडेल्सचे पेमेंट आणि रेवेन्यू संदर्भात चर्चा केली जात होती. त्यानंतर आणखी नवे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहेत.

यातील एक चॅट १० नोव्हेंबर २०२० रोजीचा आहे. यात एक छापून आलेली बातमी शेअर करण्यात आली आहे. चॅटमध्ये शेअर केलेल्या बातमीनुसार, पोर्न कंटेट दाखवल्याच्या आरोपावरून ७ ओटीटी प्लॅटफॉर्म्सना नोटिस पाठवण्यात आली आहे. या चॅटवरील रिप्लायमध्ये “Thank God U Planned BF” असं लिहिलंय. या चॅटमध्ये राज कुंद्रा म्हणतो, “सध्या काही दिवसांसाठी एक्सट्रीम बोल्ड कंटेंटला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून डिलीट करून टाका…आपल्या HS (हॉटशॉट)ला सुरू ठेवण्यासाठी इतर मार्ग शोधावे लागणार आहेत.”

Raj-Kundra

२३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले. राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. या प्रकरणी त्याला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj kundra case police seize server from office shilpa shetty husband pornographic content case prp