पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यापासूनच अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींची नावं चर्चेत आली आहेत. याच खास करून पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांच्या नावांची अधिक चर्चा आहे. कारण राज कुंद्रासोबत पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राने करार केला होता. दोघींनी देखील राज कुंद्रासाठी काम केलं आहे. यानंतर आता सोशल मीडियावर पूनम पांडेचा एका व्हिडीओ व्हायरल होवू लागलाय. या व्हिडीओत पूनमने न्यूडिटीवर तिचं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज कुंद्रा प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसह अनेकांनी राज कुंद्राचे अ‍ॅपवरील फिल्म या पॉर्नोग्राफी नसून इरोटिका म्हणजेच न्यूडिटीच्या श्रेणीत येत असल्याचं म्हंटलं आहे. याबद्दलच आता पूनम पांडेने खुलासा केलाय. या व्हिडीओत पूनमने काही उदाहरणं देत न्यूडिटी म्हणजे एक कला असल्याचं म्हंटलं आहे.

हे देखील वाचा: “माझा मोबाईल नंबर लीक केला आणि…”; पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप

पॉर्नोग्राफी आणि न्यूडिटीमध्ये फरक असल्याचं पूनम म्हणाली आहे. ती म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी मला फोन आणि मेसेज करून पॉर्नोग्राफी आणि इरॉटिकातील फरक स्पष्ट करण्यास सांगितलं. मला एवढं ज्ञान नसलं तरी मला न्यूडिटीचा अर्थ माहित आहे. कारण मी न्यूड फोटोशूट केले आहेत. आपण एखाद्या पुस्तकाच्या दुकानातून कामसूत्र पुस्तक विकत घेऊ शकतो. ७० च्या दशकात लोकप्रिय चित्रकार एम एफ हुसैन यांनी अनेक न्यूड चित्र काढली आहेत. न्यूडिटीकडे कला म्हणून पाहिलं गेलं पाहिजे.” असं पूनम म्हणाली.

पुढे पूनम पांडेने मंदिरांचे दाखले देत न्यूडिटीबद्दल खुलासा केलाय. ” आपल्याकडे अशी अनेक सुंदर मंदिर आहेत. तिथल्या नग्न मूर्ती पहा. ही सर्व एक सुंदर कला आहे. हेच आमच्या सिनेमातही दिसतं. याला एका प्रकारच्या कलेच्या रुपात दाखवलं जातं. असा मी विचार करते.” असं म्हणत पूनम पांडेने न्यूडिटीवर तिचे विचार माडंले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra case poonam pandey explains difference between pornography and nudity said nudity is art kpw
First published on: 28-07-2021 at 15:59 IST