शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्राची प्रतिक्रिया

शिल्पा तिच्या मैत्रीणींकडे माझ्याविषयी तक्रार करायची.

shilpa shetty, raj kundra
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

मागील काही महिन्यात बॉलीवूडमधील अनेक जोडपी विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत. रणबीर कपूर आणि कतरीना कैफचा ब्रेकअप, फरहान अख्तर-अधुना यांचा घटस्फोट तर अरबाज खान-मलायका हेदेखील विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, या यादीत अजून एका बॉलीवूड अभिनेत्रीचे नाव जोडले गेले ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे.
शिल्पा आणि राज यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते. गेल्या काही दिवसांपासून राज त्याच्या घरी जात नव्हता. तो मुंबईमधील त्याच्या ऑफिसमध्येच राहत होता. यामुळे शिल्पा आणि राज यांच्यात काही तरी मतभेद झाल्याची चर्चा होती. पण मिस मालिनी या वेबपोर्टलच्या सूत्रांनी माहिती काढली असता या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे समोर आले. त्यानंतर तर आता,  माहित नाही या सर्व अफवा कुठून सुरु झाल्या अशी प्रतिक्रिया स्वतः राज कुंद्राने डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. राज म्हणाला की, मी गेले काही दिवस ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे शिल्पा तिच्या मैत्रीणींकडे माझ्याविषयी तक्रार करायची बहुदा त्याचवेळी या अफवांना सुरुवात झाली असावी. माझं माटुंग्याला ऑफिस आहे. तेथे मी २० तासांपेक्षाही अधिक वेळ काम करत होतो. खाणं आणि झोपणं सोडाचं पण मला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता. इतका मी कामात व्यस्त होतो. फक्त आंघोळीसाठी आणि कपडे बदलण्यासाठी मी घरी जायचो.
चला निदान राजच्या प्रतिक्रियेमुळे शिल्पाच्या चाहत्यांना तरी दिलासा मिळाला असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj kundra comments on his divorce from shilpa shetty rumours

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या