बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पेला अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळ-जवळ तीन महिन्यांनी राज कुंद्राला बेल मिळाली आहे. या प्रकरणात अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींची नवे समोर आली. यात ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि मॉडेल शर्लिन चोप्राचे नावं अधिक चर्चेत आहे. शर्लिनने राजवर अनेक आरोप केले आहेत. मात्र गहना नेहमीच राजच्या बाजूने बोलताना दिसली आहे. आता गहनाने शर्लिन बाबत एक मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गहनाचे म्हणे आहे की शर्लिन जे काही करते ते फक्त लोकांचे लक्ष केंद्रित करुन घेण्यासाठी करत आहे. तसंच ती खूप स्वार्थी आहे. राज कुंद्राला ज्याने तिला पैसे कामावण्यासाठी मदत केली, त्यालाच तिने या प्रकरणात फसवले आहे. शर्लिननेचं गुन्हे शाखेकडे पहिले स्टेटमेंट दिले होते. ‘इ-टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, ” शर्लिनकडे आज जे काही आहे ते राज कुंद्रामुळे आहे. तिने त्याचे फक्त आभारच नाही तर पूजा केली पाहिजे”.

शर्लिन चोप्राला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी राजने भागपाडले, असा शर्लिनचा आरोप आहे. या बद्दल बोलताना गहनाने ती म्हणते, “राजने शर्लिनला नाही तर शर्लिनने राजला या इंडस्ट्रीमध्ये ओढले आहे. २०१२ पासून ती पॉर्न फिल्म आणि अश्लील कंटेंट बनवते आहे. तिची आणि राजची अडीच वर्षांपूर्वी भेट झाली. शर्लिनला फक्त कपडे कसे काढायचे हेचं माहिती आहे, म्हणून ती इतरांवर चिखल उडवायचे काम करत आहे.

गहना पुढे म्हणली, “शर्लिनला चांगलेच ठाऊक आहे की जर ती राजच्या विरोधात बोली तर ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल. तसंच ती या सर्वात शिल्पा शेट्टीला देखील ओढणायचा प्रयत्न करत आहे. परंतु ती तसे करु शकली नाही.” पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने तिच्या इन्स्टग्रामवर अनेक मोटीवेशन पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शिल्पा शेट्टीला राज कुंद्रासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने उत्तर देण्यास नकार दिला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kundra pornography case gehana says sharlin should worship raj kundra aad
First published on: 28-09-2021 at 13:20 IST