‘गुप्तांग दाखवण्यात येणार नाही असं सांगून…’,पॉर्नोग्राफी प्रकरणात एका अभिनेत्रीचा खुलासा

राज कुंद्राच्या अटकेनंतर पॉर्नोग्राफी प्रकरणात आता हळूहळू अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहे.

raj kundra, pornography case victim,
राज कुंद्राच्या अटकेनंतर पॉर्नोग्राफी प्रकरणात आता हळूहळू अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर या प्रकरणात प्रत्येक दिवशी अनेक गोष्टी समोर येताना दिसतं आहेत. आता यात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता या प्रकरणात एका मुलीने आरोप केले आहेत की व्हिडीओत गुप्तांग दाखवले जातेल हे आम्हाला चित्रीकरणा दरम्यान सांगितले नव्हते. तर त्यांचे गुत्पांग दाखवले जाणार नाही असे चित्रीकरणाआधी त्यांना सांगण्यात आले होते. फसवणूक करत त्यांचे व्हिडीओ शूट केले आणि ते व्हिडीओ अॅपवर टेलिकास्ट केले.

पीडित मुलीने या प्रकरणात माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. पीडित मुलीने बुधवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत ज्या मुलींने पॉर्नोग्राफी प्रकरणात गंभीर खुलासे केले आहेत, त्यापैकी अनेक मुली समोर आल्या नाहीत.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील ‘या’ आलिशान रेस्टॉरंटमध्ये असते बॉलिवूड कलाकारांची रेलचेल!

‘टाइम्स नाव’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफी प्रकरणात समोर आलेल्या या मुलीचा जबाब नोंदवला आहे. यात असे म्हटले आहे की, चित्रीकरणाआधी तिला सांगितले होते की तिचे इंटिमेट सीन्स शूट केले जातील आणि तिचे गुत्पांग दाखवले जाणार नाही.

आणखी वाचा : ‘दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध आणि…’, नर्गिस फाखीरने केला धक्कादायक खुलासा

या सगळ्या विषयी त्यांच्याकडून एक करार करूण घेतला होता आणि त्यासाठी त्यामुलींना काही हजार रुपये देण्यात आले होते. पीडित मुलीला तिच्या एका मित्राने सांगितले की एका अॅपवर तिचा पॉर्नव्हिडीओ आहे. त्यानंतर जेव्हा पीडितने तो व्हिडीओ पाहिला तेव्हा तिच्या लक्षात आले की व्हिडीओ कुठेच कट आणि एडिट न करता अॅपवर अपलोड केला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर आतापर्यंत अनेक मुलींनी या प्रकरणात पुढे येऊन हे खुलासे केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj kundra pornography case victim claims private parts were shown without her consent dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती