scorecardresearch

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयामध्ये दाखल

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत हे दिल्ली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी राष्ट्रपतींबरोबरच पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयामध्ये दाखल
चेन्नईमधील खासगी रुग्णालयात करण्यात आलं दाखल (फाइल फोटो)

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना गुरुवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं आहे. रजनीकांत हे नियमीत आरोग्य तपासणीसाठी म्हणजेच रुटीन हेल्थ चेकअपसाठी रुग्णालयात गेले असता त्यांना दाखल करुन घेण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रजनीकांत हे दिल्लीमध्ये होते. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलं.

आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान रजनीकांत यांनी राष्ट्रपती रामनात कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर चेन्नईमध्ये परतल्यानंतर गुरुवारी ते नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं आहे. यापूर्वी मागील वर्षीच डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रक्तदाबासंदर्भातील तक्रार असल्याने त्यांना त्यावेळी रुग्णालयात भरती करण्यात आलेलं. मात्र नक्की कोणत्या कारणासाठी त्यांना रुग्णालायात दाखल केलंय हे स्पष्ट झालेलं नाही.

७० वर्षीय रजनीकांत यांनी आजवर त्याच्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. गेली ३० वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने गौरवण्यात आले. यावेळी रजनीकांत यांची पत्नी लता, मुलगी सौंदर्या आणि जावई धनुष हे उपस्थित होते. 

रजनीकांत यांनी १९७५ साली चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. के भालचंद्र यांच्या अपूर्वा रागंगल या चित्रपटामधून त्यांनी आपल्या कारर्किदीचा श्री गणेशा केला. रजनीकांत हे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये ४५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. ‘बिल्लू’, ‘मुथ्थू’, ‘बासाह’, ‘शिवाजी’, ‘इथीरान’ यासारखे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-10-2021 at 09:30 IST

संबंधित बातम्या