Rajinikanth Highest Box Office collection Grossing Movies : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर २’ सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमासाठी चाहतावर्ग जबरदस्त उत्साही असतो. ‘जेलर २’ सिनेमाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिलेला असून अगदी चित्रपटगृहाबाहेरसुद्धा जल्लोष सुरू असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही चाहत्यांनी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेकही केला आहे. रजनीकांत यांच्या सिनेमांनी कोट्यवधींची कमाई केली असून त्यांच्या १० रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या सिनेमांबद्दल जाणून घेऊया.

१. २.O


रजनीकांत व अक्षय कुमार यांचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘२.०’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. सायन्स फिक्शन आणि दमदार ॲक्शन असलेल्या या सिनेमातून पक्ष्यांना होणारा त्रास प्रभावीपणे मांडण्यात आला होता. या सिनेमाने जगभरात जवळपास ६९१ कोटी रुपयांची कमाई केली होती. तमिळ चित्रपटसृष्टीत हा चित्रपट हिट ठरला, तर हिंदीत सुपरहिट झाला. शंकर षण्मुगम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते.

२. जेलर

सुपरस्टार रजनीकांत यांचा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जेलर’ हा चित्रपट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेल्सन दिलीपकुमार यांनी या ॲक्शन थ्रिलरचं दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने जगभरात ६०४ कोटी रुपयांची कमाई केली होती. रजनीकांत यांच्यासोबतच मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिवराजकुमार यांसारखे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. ‘जेलर’चा सिक्वेल ‘जेलर २’ आजच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रजनीकांत व अक्षय कुमार यांचा सिनेमा

३. कुली

२०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुली’ हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. लोकेश कनगराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रजनीकांत यांच्याबरोबर नागार्जुन अक्किनेनी आणि सौबिन शाहिर यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाने जगभरात ५१८ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जास्त दिवस टिकू शकला नाही.

४. कबाली

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ या चित्रपटाला ६.१ आयएमडीबी रेटिंग मिळाले होते. पा. रंजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रजनीकांत यांच्याबरोबर राधिका आपटेने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाने जगभरात २९५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी सरासरी ठरली.

५. एंथिरन / रोबोट

रजनीकांत व ऐश्वर्या राय बच्चन यांचा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘एंथिरन’ सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. मूळच्या तमिळ असलेल्या या सिनेमाचे हिंदीमध्ये डबिंग करून त्याला रोबोट असे नाव दिले गेले. सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाला ७.२ आयएमडीबी रेटिंग मिळाले होते. एस. शंकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते. ‘एंथिरन’ने जगभरात २९१ कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरला होता.

रजनीकांत ‘रोबोट’ सिनेमा

६. वेट्टैयन

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेट्टैयन’ या सिनेमाला ६.८ आयएमडीबी रेटिंग मिळाली होती. टी. जे. ज्ञानवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने जगभरात २५५.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.

७. पेट्टा

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पेट्टा’ या चित्रपटाला ७.२ अशी आयएमडीबी रेटिंग मिळाली होती. कार्तिक सुब्बाराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने जगभरात २५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवरील त्याची कामगिरी सरासरीपेक्षाही कमी ठरली.

८. दरबार

२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दरबार’ या चित्रपटाला ५.९ आयएमडीबी रेटिंग मिळाले होते. ए. आर. मुरुगदास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. रजनीकांत यांच्याबरोबर नयनतारा या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाने जगभरात २४७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

९. अन्नाथे

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अन्नाथे’ या चित्रपटाला आयएमडीबी रेटिंग फक्त ४ मिळाली होती. शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. रजनीकांत यांच्यासह कीर्ती सुरेश आणि नयनतारा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने जगभरात १७२ कोटी रुपयांची कमाई केली होती.

रजनीकांत यांचा ‘शिवाजी : द बॉस’ सिनेमा

१०. शिवाजी : द बॉस

२००७ मध्ये प्रदर्शित झालेला रजनीकांत यांचा ‘शिवाजी’ हा सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. ७.६ आयएमडीबी रेटिंग असलेल्या या सिनेमाने फक्त दाक्षिणात्य नाही तर हिंदी सिनेविश्वातही लोकप्रियता मिळवली होती. शिवाजी या सिनेमाचे एस. शंकर यांनी दिग्दर्शन केले होते. रजनीकांत यांच्याबरोबर श्रिया सरन या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटाने जगभरात १५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.