रजनीकांत यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही – राधिका आपटे

‘कबाली’मध्ये राधिका आणि रजनीकांत एकत्र दिसणार.

रजनीकांत आणि राधिका आपटे

सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रशंसकांमध्ये राधिका आपटेचे नावदेखील जोडले गेले आहे. रजनीकांत यांच्यासारखे अन्य कोणीही नसल्याचे तिने म्हटले आहे. ‘कबाली’ या तमीळ चित्रपटात ती रजनीकांत यांच्याबरोबर अभिनय करताना दिसणार आहे. तिचा ‘फोबिया’ नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून, अलिकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. रजनीकांत यांच्याबरोबर अभिनय करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याची भावना या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना तिने व्यक्त केली. नक्कीच, माझ्या आयुष्यातील चांगल्या अनुभवांपैकी एक असलेला हा अनुभव खूप प्रेरणादायी होता. ते एक अदभूत व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नसल्याचे ती म्हणाली. ‘कबाली’ या तमीळ गँगस्टर ड्रामा प्रकारातील चित्रपटात रजनीकांत डॉनची व्यक्तिरेखा साकारत असून, राधिका त्यांच्या बायकोच्या भूमिकेत दिसेल. ‘कबाली’चे मलेशियातील चित्रीकरण उत्तमपणे पार पडल्याचे सांगत, चित्रीकरण पूर्ण झाले असून, डबिंगचे काम चालू असल्याची माहिती राधिकाने दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajinikanth is unmatchable says radhika apte