scorecardresearch

Premium

राजकुमार रावने खरेदी केलं जान्हवी कपूरचं आलिशान घर, अभिनेत्रीला झाला ‘इतक्या’ कोटींचा नफा

जान्हवी कपूरने २ वर्षांपूर्वीच हे घर विकत घेतलं होतं.

Rajkummar Rao New Home, Rajkummar Rao New Apartment, Rajkummar Rao News, Rajkummar Rao Patralekha House, Rajkummar Janhvi Kapoor House, राजकुमार राव, जान्हवी कपूर, राजकुमार राव नवीन घर, राजकुमार राव जान्हवी कपूर चित्रपट, जान्हवी कपूर अपार्टमेंट, राजकुमार राव आगामी चित्रपट
जान्हवीने हे घर विकून करोडोंचा नफाही कमावला आहे.

राजकुमार राव बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा राजकुमार राव अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेतही असतो. आताही असंच काहीसं घडलंय ज्यामुळे राजकुमारच्या नावाची चर्चा बीटाऊनमध्ये होताना दिसत आहे. राजकुमार रावने मुंबईत एक आलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट विकत घेतले आहे.

राजकुमार रावने नव्याने घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल ४४ कोटी रुपये एवढी आहे. हे अपार्टमेंट मुंबईच्या जुहू भागात असून विशेष म्हणजे त्याने हे अपार्टमेंट अभिनेत्री जान्हवी कपूरकडून खरेदी केले आहे. राजकुमार आणि जान्हवीने ‘रुही’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांमध्ये उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळाली. जान्हवीने हे घर विकून करोडोंचा नफाही कमावला आहे.

Siddharth on being forced to leave Chithha event in Bengaluru
“मी पैसे खर्च करून…”, राजकीय वादातून आंदोलकांनी चित्रपटाचं प्रमोशन थांबवल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
sukanya mone visit cm eknath shinde home
“मी तुमची पूर्वीपासून चाहती” मिसेस मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ शब्द ऐकताच सुकन्या मोने सुखावल्या; सांगितला ‘वर्षा’वरील अनुभव
jawan-shahrukh2
१००० कोटी कमावण्याबद्दल शाहरुखने केलेली १० वर्षांपूर्वीच भविष्यवाणी; किंग खानचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
meena kumari
गोष्ट पडद्यामागची: मीनाकुमारी-धर्मेंद्रची लव्हस्टोरी अन् ‘पाकीझा’च्या निर्मितीचा १४ वर्षांचा वनवास

आणखी वाचा- “यासाठी कोणाला शिक्षा…” रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर जान्हवी कपूरची प्रतिक्रिया

जवळपास २ वर्षांपूर्वी जान्हवी कपूरने हे अपार्टमेंट खरेदी केलं होतं. डिसेंबर २०२० मध्ये ३९ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं असं बोललं जात आहे. या व्यवहारातून जान्हवीला ५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. हे अपार्टमेंट ३४५६ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. या अपार्टमेंटमध्ये एका स्क्वेअर फूटची किंमत जवळपास १.२७ लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे हा देशातील महागडा व्यवहार मानला जात आहे.

राजकुमार आणि त्याची पत्रलेखा यांनी यापूर्वी याच इमारतीच्या ११ व्या आणि १२ व्या मजल्यावर एक अपार्टमेंट खरेदी केले होते. राजकुमार आणि जान्हवी यांनी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रूही’मध्ये एकत्र काम केले होते. आगामी काळात दोघंही ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajkumar rao bought janhvi kapoor luxurius apartment mrj

First published on: 30-07-2022 at 17:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×